Nashik News : मैदानावर खेळला शेवटचा सामना; तरुण क्रिकेटपटूचा बॅटिंग करताना मृत्यू

Nashik : देवळा तालुक्यात एका महत्त्वपूर्ण क्रिकेट सामना सुरु असताना यश अहिरे हा आपल्या संघासाठी खेळत होता. फलंदाजी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, दुर्दैवाने तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

नाशिक : क्रिकेटच्या मैदानावर सामना खेळत असताना फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेत असताना अचानक तो मैदानावर कोसळला. हृदयविकाराच्या झटक्याने तरुण क्रिकेटपटूचा मैदानावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या दहिवडी गावात घडली आहे. यामुळे त्याच्यासाठी हा सामना अंतिम ठरला आहे. 

नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड गावातील क्रिकेटपटू आणि आरंभ ऑनलाइन सर्विसेस'चे संचालक यश सुनील अहिरे (वय २४) यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे. देवळा तालुक्यात एका महत्त्वपूर्ण क्रिकेट सामना सुरु असताना यश अहिरे हा आपल्या संघासाठी खेळत होता. फलंदाजी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, दुर्दैवाने तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.

Nashik News
Pune : भोरमध्ये भीषण अपघात, ९ जणांना घेऊन जाणारी कार १०० फूट दरीत कोसळली

बाद होऊन मैदानाबाहेर गेला प्रकृती खालावली 
सामन्यादरम्यान यशने आत्मविश्वासाने फटकेबाजी करत आपली चमक दाखवली. यशची फलंदाजी सुरु असताना उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला. मात्र, तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Nashik News
Nandurbar Traffic Police : वर्षभरात ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई; नंदुरबार वाहतूक पोलिसांची कारवाई

शेवटच्या खेळाचा भावनिक व्हिडिओ

आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने तो संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाला होता. गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून त्यांनी अनेकांची कामे सुलभ केली होती. दहिवडसह संपूर्ण तालुका आज यशच्या या दुर्दैवी घटनेमुळे शोकमग्न झाला आहे. मैदानावर शेवटच्या फटक्यांसह संघाला विजयाकडे नेणारा हा खेळाडू मैदानाबाहेर शेवटची झुंज हरला. दरम्यान यशच्या शेवटच्या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो शेवटचे फटके मारताना आनंदी आणि उत्साहाने भरलेला दिसत होता. मात्र, हा आनंद काही काळच टिकला. व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण भावूक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com