Mauni Amavasya : मौनी अमावस्या कधी? काय आहे या दिवशी मूक ध्यानाचे महत्त्व? नियम काय, वाचा सविस्तर | Marathi News

Mauni Amavasya 2025 : हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींपैकी मौनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी पाळण्यात येणाऱ्या मौनाचे महत्व काय? त्याचे योग्य नियम कोणते? मौन केल्याने काय फायदा होतो? याची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Mauni Amavasya
Mauni AmavasyaSaamTv
Published On

हिंदू धर्मात अमावस्येची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते. त्यातही सर्व अमवस्यांपैकी मौनी अमावस्येला अधिक महत्व दिलं गेलं आहे. वर्षात १२ अमावस्या तिथी असतात. त्यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते. अध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची असलेली अमावस्या म्हणूनही मौनी अमावस्येकडे पहिलं जातं.

अशी मान्यता आहे की, मौनी अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसंच पूर्वजांसाठीही मौनी अमावस्या महत्त्वाची मानली जाते. यादिवशी पितरांना नैवेद्य आणि पिंडदान करण्याची देखील पद्धत आहे. मौनी अमावस्येला पितरांना तर्पण आणि पिंड दान अर्पण केल्याने तीन पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

मौनी अमावस्येला मूक ध्यान केल्याने शुभ फळ मिळत असल्याने या दिवशी मौन साधनाही केली जाते. मात्र ही मौन साधना करत असताना काय काळजी घ्यावी? त्याचे काय महत्व आहे, नियम काय आहे हे देखील माहीत असणं महत्वाचं आहे.

Mauni Amavasya
Sambhajinagar : तरुणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला धु धु धुतला | video

यावर्षी मौनी अमावस्या कधी आहे?

या वर्षी माघ महिन्यातील अमावस्या तिथी २८ जानेवारीला संध्याकाळी ७.३५ वाजता सुरू होणार आहे. ही तारीख २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६:०५ वाजता संपेल. अशा स्थितीत २९ जानेवारीला मौनी अमावस्या साजरी होणार आहे. या दिवशी उपवास आणि पूजाही केली जाईल. त्याच दिवशी महाकुंभात दुसरा अमृतस्नानही होणार आहे.

Mauni Amavasya
Pune News : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर! प्रजासत्ताक दिनानिमित्त २० रुपयांत मिळणार मेट्रो कार्ड | Video

मूक ध्यानाचे महत्त्व काय?

मौनी अमावस्येला ऋषी-मुनी मौन पाळतात. मौनी अमावस्येला मौन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते. मौन व्रत पाळणे किंवा साधना केल्याने तणावातून आराम मिळतो. मनाला शांती मिळते. एकाग्रता वाढते. ध्यान करणे सोपे होते. शांतता देवाशी जोडण्यास मदत करते. मौनी अमावस्येला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो.

Mauni Amavasya
Saraswati Pujan 2025: सरस्वती पूजन 2025 मध्ये कधी असेल? 2 फेब्रुवारी की ३, जाणून योग्य तारिख आणि वेळ

शांततेचे हे नियम तुम्हाला माहिती का?

- मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावे.

- यानंतर गप्प बसावे. दिवसभर मौन धारण करून जप आणि तपश्चर्या करावी.

- या तारखेच्या समाप्तीनंतरच मौन तोडले पाहिजे. त्यानंतर बोलायला हवे.

- मूक ध्यान केल्यानंतर रामाचे नाम घेणे सर्वोत्तम मानले जाते.

Mauni Amavasya
Baba Vanga: बाबा वेंगांची भविष्यवाणी कोण डिकोड करतं? कुठे लिहून ठेवल्यात या गोष्टी?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com