Saraswati Pujan 2025: सरस्वती पूजन 2025 मध्ये कधी असेल? 2 फेब्रुवारी की ३, जाणून योग्य तारिख आणि वेळ

Saraswati Pujan Date and Time : बसंत पंचमी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. याच दिवशी विद्येची देवता सरस्वतीची पूजा केली जाते.
Saraswati Pujan Date and Time
Saraswati Pujan 2025canva
Published On

माघ महिन्यातील प्रमुख सणांमधला एक सण म्हणजे बसंत पंचमी यालाच आपण सरस्वती पूजा म्हणून ओळखतो. बसंत पंचमी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. याच दिवशी विद्येची देवता सरस्वतीची पूजा केली जाते. कारण याच दिवशी सरस्वती देवीचा जन्म झाला होता. सरस्वतीचे खूप अनोखे आहे. तर यंदा २०२५ मध्ये नेमकी कोणत्या दिवशी पूजा करायची हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.

सरस्वतीच्या हातात पुस्तक, वीणा आणि माळ असते जी श्वेत कमळावर विराजमान असते. त्यामुळे सरस्वती पुजनाच्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. सरस्वती ही विद्येची देवता असते. तसेच संगीत, कला, विज्ञान आणि कारागिरीची देवी आहे. म्हणूनच या दिवसाला श्री पंचमी, माघ पंचमी किंवा सरस्वती पूजा म्हणतात. चला तर जाणून घेऊ तारिख मुहूर्त आणि महत्वाचे विधी.

Saraswati Pujan Date and Time
Healthy Habits: कमी जेवायचं की पोटभर? जाणून घ्या जेवणाची योग्य पद्धत

सरस्वती पूजेची तिथी आणि शुभ मुहूर्त काय आहे?

पंचांगानुसार बसंत पंचमीची तिथी ०२ फेब्रृवारी २०२५ ला सकाळी ९.१४ मिनिटांनी सुरू होणार आहे. याची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच ०३ फेब्रृवारी २०२५ ला ६ वाजून ५२ मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे यंदा बसंत पंचमी ०२ फेब्रृवारी २०२५ ला साजरी होणार आहे. तर सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी ०७.०९ पासून १२.३५ पर्यंत असणार आहे. सरस्वती पूजेचे शुभ मुहूर्त ५ तास २६ मिनिटे असणार आहे.

सरस्वती पूजन २०२५ विधी

०३ फेब्रृवारी २०२५ ला सरस्वती मातेची विधी नुसार पुजा करा. त्यासाठी सर्वप्रथम सरस्वती देवीची मुर्ती पिवळ्या वस्त्रावर ठेवा. हे वस्त्र स्वच्छ असायला हवे. त्याच सोबत सरस्वतीला पिवळ्या रंगाचा टिक्का लावून पिवळी फुले अर्पण करावीत. कारण पिवळा रंग हा सरस्वती मातेचा आवडता रंग आहे. सरस्वतीला पिवळ्या हळदीचा टिक्का, पिवळी फुले, त्याचसोबत पिवळी फळे, मिठाई सुद्धा अर्पण केली पाहिजे. या दिवशी अभ्यासासंबंधीत वस्तुंची पुस्तकांची सुद्धा पूजा केली जाते. तर या दिवशी हळदी-केसरच्या दुधाच्या नैवेद्य सरस्वती मातेला अर्पण केला जातो. याने देवी प्रसन्न होते आणि तुम्हाला यश मिळते.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Saraswati Pujan Date and Time
Health Risks: तुमच्या घरातही प्लास्टिकची भांडी वापरता? होईल कॅन्सरचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com