
प्रत्येक व्यक्तीचं घरातल्या भांड्याशी एक वेगळं नातं असतं. प्रत्येकाची ठरलेली ताटं, वाट्या, चमचे अशी विविध दैनंदिन जीवनात स्वयंपाकघरातील भांडी खूप महत्वाची असतात. पण आपण त्या भांड्यांची तितकी काळजी घेणं महत्वाचं असतं. अन्यथा आपल्या आरोग्यासाठी ते धोक्याचे ठरू शकते. विशेषत: कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचं कारण ठरू शकतात. या अभ्यासानुसार, तज्ज्ञ म्हणाले की, प्रत्येकाच्या घरात असणारी प्लास्टीकची भांडी याचं मुख्य कारण असतात.
शरीरावर कसा परिणाम होतो?
स्वयंपाकघरातल्या भांड्यांमध्ये प्लास्टिकचे कण असतात जे उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या अन्नात नकळत उतरू शकतात. तर हे कण पोटात जमा होतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. हे मायक्रो लहान मुलांसाठी खूप घातक असू शकतात. हे कण जेव्हा शरीरात साठतात तेव्हा कॅन्सर, हार्मोनल असंतुलन आणि इतर गंभीर आजारांची लागण होऊ शकते. असं तज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे.
तज्ज्ञांचे मत काय?
भांडी हा प्रत्येक गृहीणीचा आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा विषय असतो. लोक दररोज त्यांचा वापर करतात. मात्र त्यापासून धोका निर्माण झाल्यावर तज्ज्ञांनी त्याचं संशोधन केलं. तज्ज्ञ म्हणाले, प्रत्यक स्वयंपाक घरात हल्ली प्लास्टिकची भांडी पाहायला मिळतात. त्यात काही प्लास्टिकचे पॅन, चमचे, लहान मुलांचे ताट असतात आणि प्लास्टिक रॅप्समध्ये मायक्रोप्लास्टिक्स असू शकतात. ही भांडी उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या अन्नात नकळत उतरू शकतात.
या समस्येवर उपाय काय?
शास्त्रज्ञ म्हणाले, अशा प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर लगेचच करणं थांबवलं पाहिजे. स्वस्त मिळणारी प्रत्येक वस्तू शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी चांगली नसते. प्रत्येक गृहीणीने भांडी खरेदी करताना स्टेनलेस स्टील, काच आणि बांबूपासून बनवलेली भांडी वापरली पाहिजे. ही भांडी शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ देत नाहीत. प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर वेळीच टाळला पाहिजे. त्याने शरीरावर कोणताच परिणाम होत नाही.