Moong Dal Khichdi : व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेवर घरगुती उपाय, मुगाच्या खिचडीत घाला फक्त हा एक पदार्थ

Health : मूग डाळ प्रत्येक भारतीयाच्या घरी असतेच. तसेच मूग डाळ भारतीयाच्या रोजच्या आहारात सुद्धा असते. ही डाळ पचायला हलकी असते. त्याचसोबत शरीराला अनेक फायदे मिळवून देणारी ही डाळ आहे.
Moong dal soup
Freepick.com
Published On

मूग डाळ प्रत्येक भारतीयाच्या घरी असतेच. तसेच मूग डाळ भारतीयाच्या रोजच्या आहारात सुद्धा असते. ही डाळ पचायला हलकी असते. त्याचसोबत शरीराला अनेक फायदे मिळवून देणारी ही डाळ आहे. मूग डाळीत व्हिटामीन्स, फायबर्स, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. या डाळीत आयर्नसुद्धा असतात. महाराष्ट्रात तर कोणी आजारी पडलं की त्यांना मुगाची खिचडी दिली जाते.

ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमी असते त्यांच्यासाठी मूग डाळ हा उत्तम पर्याय आहे. पण मुगडाळीत फक्त मीठ किंवा नेहमीचे साहित्य टाकता त्यात एक महत्वाचा पदार्थ समावेश केला पाहिजे. त्याने तुमच्या शरीरात असलेल्या पौष्टीक गुणधर्मांची कमी भासणार नाही. ते कोणकोणते पदार्थ आहेत हे आपण पुढील मुद्यांमधून जाणून घेऊ.

Moong dal soup
Post-Workout Tips: वर्कआउटनंतर साधं पाणी प्यायचं की थंड? चूक करण्यापूर्वी ही बातमी वाचाच

मूगाची खिचडी पौष्टीक करणारा पदार्थ कोणता?

मूग डाळीची खिचडी जेव्हा तुम्ही तयार करत असाल तेव्हा त्यात टोफू मिक्स करू शकता. टोफूमुळे याचे आरोग्यदायी फायदे अधिकच वाढतात.

मूग डाळीच्या खिचडीत मिसळा हा पदार्थ

कधीही मूग डाळीची खिचडी तयार करायची असेल तेव्हा त्यात तूप मिसळायला विसरू नका. तूपामुळे शरीरातले हेल्दी फॅट्सचे प्रमाण वाढते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय संपुर्ण दिवस आलस येत नाही.

मूगाच्या खिचडीचे फायदे

मूग डाळीच्या खिचडीत प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स असतात. हे ह्दयासाठी फायदेशीर असतात. तसेच या खिचडीने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. यामुळे शरीराचे संक्रमण आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.

मूगाची खिचडी रेसिपी

साहित्य:

तांदूळ - १ कप

मूग डाळ (साल काढलेली) - १/२ कप

तूप - २ टेबलस्पून

जिरे - १ टीस्पून

हिरवी मिरची - २ (चिरलेली)

आले - १ टीस्पून (चिरलेले)

हळद - १/२ टीस्पून

मीठ - चवीनुसार

पाणी - ३-४ कप

साजूक तूप - गार्निशसाठी

कृती:

तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुऊन १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. एका कढईत २ टेबलस्पून तूप गरम करा. फोडणी तयार करणे. तूप तापल्यानंतर त्यात जिरे घालून तडतडू द्या. मग त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि आले घालून परता. हळद घाला आणि त्यानंतर भिजवलेले तांदूळ व मूग डाळ घालून २-३ मिनिटे परता. त्यात ३-४ कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व काही नीट हलवून गॅस कमी करून झाकण ठेवा. खिचडी १५-२० मिनिटे किंवा तांदूळ आणि डाळ मऊ होईपर्यंत शिजवा. अधूनमधून ढवळत रहा. गरमागरम खिचडीवर साजूक तूप घाला. लोणचं, दही किंवा पापडासोबत खिचडी सर्व्ह करा.

Moong dal soup
Republic day 2025 : प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार? मंत्र्यांची यादी आली समोर, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com