Post-Workout Tips: वर्कआउटनंतर साधं पाणी प्यायचं की थंड? चूक करण्यापूर्वी ही बातमी वाचाच

Workout Recovery Tips: बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आता लोक मोठ्या संख्येने जीम वर्कआउट करत असतात. वर्कआउटकेल्याने त्यांच्या शरीतला फॅट घामाने बाहेर येतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांना डॉक्टर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
Workout Recovery Tips
Post-Workout Tipsai
Published On

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आता लोक मोठ्या संख्येने जीम वर्कआउट करत असतात. वर्कआउटकेल्याने त्यांच्या शरीतला फॅट घामाने बाहेर येतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांना डॉक्टर पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपण दहा मिनिटे सगळ धावलो तरी आपण थकतो आणि पाणी पितो. मात्र अनेकांना हा प्रश्न पडतो की, वर्कआउटनंतर थंड पाणी प्यायचं की साधं पाणी? याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

एक्सपर्टच्या मते, वर्कआउटनंतर थंड पाणी पिणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. कारण जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा आपल्या शरीरातलं तापमान वाढत असतं. या वेळेस जर तुम्ही लगेचच थंड पाणी पीत असाल तर तुमची सगळी मेहनत वाया जावू शकते. याचं कारण म्हणजे तुमची गरम झालेली बॉडी एकाएकी थंड होते. यासोबत सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वर्कआउटनंतर तुम्ही साधं पाणी पिणं योग्य मानलं जातं. त्याने तुमच्या शरीराला होणारा धोका कमी होतो. याच नाही तर पुढे अशा अनेक गंभीर समस्या आहेत. त्यांची पुढील मुद्यांद्वारे समजून घ्या.

Workout Recovery Tips
Republic day 2025 : प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार? मंत्र्यांची यादी आली समोर, वाचा

थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का?

जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा तुमचं शरीर गरम झालेलं असतं. त्यात तुम्ही थंड पाणी प्यायलात तर तुमचं वजन वाढू शकतं. त्यात तुम्हाला बेली फॅटच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. अशा वेळेस तुम्ही साधं पाणी पिणं योग्य असतं. हा उपाय तुम्ही घरी वर्कआउट करताना फॉलो करणं महत्वाचे आहे.

थंड पाणी प्यायल्याने हार्ट रेटवर प्रभाव पडतो का?

जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा तुमच्या हार्ट बीट फास्ट झालेल्या असतात. त्यात तुम्ही थंड पाणी प्यायलात तर त्याचा हार्ट बीटवर परिणाम होतो. यावेळेस नसांमध्ये वेगानं ब्लड सर्कुलेशन होतं आणि अचानक थंड पाणी प्यायल्यास नसा थंड होतात. त्यामुळे वर्कआउट केल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Workout Recovery Tips
Til Gul Poli Recipe: टिफीन बॉक्समध्ये द्या खुसखुशीत तीळाची गूळ पोळी, मुलं होतील खुश आणि तंदुरुस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com