ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनाचे धाडस आणि शरीराची ऊर्जा एकत्रितरित्या काम करतील. कोर्टकचेरीच्या कामांमध्ये सुद्धा सहज बाजी माराल.
जोडीदाराच्या काळजीत व्यस्त रहाल. त्रासदाय घटना घडण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी खर्च करावा लागेल.
विद्यार्थी वर्गासाठी चांगला काळ आहे. बौद्धिक गोष्टींमध्ये प्रगती कराल. विष्णू उपासना फलदायी.
शेतकरी वर्गासाठी सुखद वार्ता येतील. जागेच्या खरेदी विक्रीत चांगला नफा मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहिल्यामुळे एक वेगळीच कार्यक्षमता वाढेल.
धाडसाने आव्हाने असणारी कामे कराल. मोडेन पण वाकणार नाही असा आजचा आपला दिवस राहणार आहे.
नको त्या ठिकाणी कागदपत्रांच्या बाबतीत कुठेही जामीन राहू नका. पैशाची आवक जावक चांगली राहील.
उमेद न हरता कामाला लागाल. स्वतःला गोंजरण्यात दिवस जाईल. व्यक्तिमत्व उठावदार आणि आकर्षक दिसेल अशी खरेदी कराल.
मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडतील. बंधनात अडकल्याची जाणीव होईल. काळजी घ्या.
नात्यांच्या मदतीने पुढे जाल. एकमेकांविषयी आदरयुक्त भावना आणि स्नेहभावना नात्यांमध्ये राहील. मैत्रीसाठी जीवाची बाजी सुद्धा माराल.
सामाजिक क्षेत्रात पुढाकार घ्याल. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्याकडून प्रेम वर्षाव होईल. हीच उर्मी आणि ऊर्जा काम करण्यासाठी फायद्याची ठरेल.
आज शिव उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. देवाने भाग्यामध्ये अनेक गोष्टीचे दान दिले आहे. याकडे सकारात्मक भावनेने पाहाल.
करियर मधून लाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वाद होतील. घरगुती गोष्टीत सृजनशील रहाल. परदेशामुळे भाग्योदय होईल. मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल.