Myanmar Thailand Earthquake  Saam tv
देश विदेश

Myanmar Thailand Earthquake : म्यानमार, थायलंडमध्ये भूकंपाने हाहाकार; १४४ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी

Myanmar Thailand Earthquake News : म्यानमार, थायलंडमध्ये भूकंपाने हाहाकार झाला आहे. १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७०० हून अधिक जखमी झाले आहेत.

Vishal Gangurde

म्यानमार-थायलंडसहित ५ देश भूकंपाच्या धक्क्याने हादरले. म्यानमार, थायलंडमध्ये ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत १४४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर ७०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

भूकंपानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. भूकंपानंतर सर्वत्र एकच धावाधाव झाली. म्यानमारच्या मांडले, ताऊंगू सारख्या शहरातही अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे ३० मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले.

म्यानमारमध्ये दोन भूकंप झाले. दोन्ही भूकंप प्रत्येकी ७.७ तीव्रता आणि ६.४ तीव्रतेचे झाले. दोन भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाले आहेत. म्यानमारचे जुंटा प्रमुख मिन आंग ह्लाइंग यांनी मृताचा आकडा वाढण्याच शक्यता व्यक्त केली आहे. बँकॉकमधील ३० मजली इमार कोसळल्यामुळे ३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ९० लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

म्यानमारमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर मांडले शहरात ६.५ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे म्यानमारसहित थायलंड, भारत, बांगलादेश आणि चीन सारख्या देशांनाही बसले. या भूकंपचा केंद्र बिंदू मध्य म्यानमार होतं. दोन भूकंपामध्ये १२ मिनिटांचा फरक होता. शहरातील अनेक इमारती कोसळल्या. या भूकंपामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

दरम्यान, म्यानमार आणि थायलंड या दोन्ही देशामध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. केंद्रबिंदू म्यानमार असलेल्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये किती वित्तहानी झाली आहे. याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. म्यानमारच्या स्थानिक वेळेनुसार दुपारच्या वेळेस झालेला भूकंप १० किलोमीटर खोलवर होता. या भूकंपामुळे मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, नोएडा आणि गाझियाबादमध्ये जमीन थरथरू लागल्याने लोक घराबाहेर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आपला DNA शेतकऱ्याचा_मी आतापर्यंत कधीही शेतकरी विरोधी भूमिका घेतली नाही : विखे पाटील

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

Ladki Bahin Yojana eKYC Date: लाडकी बहीणींना eKYC कधीपर्यंत करता येईल?

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT