Chhattisgarh steel plant blast  Saam tv
देश विदेश

कोळसा भट्टीत भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू

Chhattisgarh steel plant blast : कोळसा भट्टीत भीषण स्फोट झाला आहे. यात 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

Vishal Gangurde

छत्तीसगडमध्ये घडली मोठी दुर्घटना

प्लांटमधील कोळसा भट्टीत भीषण स्फोट

7 कामगारांचा मृत्यू

छत्तीसगडच्या बलौदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बलौदाबाजारात स्टील प्लांटमधील कोळसा भट्टीत भीषण स्फोट झाला. या घटनेत ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ५ लोक गंभीर जखमी झाले आहेत.

स्फोटातील जखमी कामगारांना भाटापारा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं.पोलिसांनी या स्फोटामागचं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

घटनेची माहिती मिळताच बलौदाबाजार जिल्हाधिकारी दीपक सोनी यांनी पोलिसांच्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचले होते. जिल्हाधिकारी सोनी आणि पोलीस अधिकारी भावना गुप्ता यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.

मृतांची नावे समोर

मोटाज अन्सारी, (26 वय)

सराफत अन्सारी, (32 वय)

साबिर अन्सारी, (37 वय)

कल्पू भुइया, (51 वय)

रामू भुइया, (34 वय)

जिल्हा अधिकारी सोनी यांनी सांगितलं की, 'भाटपारा ग्रामीण भागातील बकुलाही गावातील स्टील प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. स्फोट कोळसा भट्टीत झाला. या घटनेत ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे'.

छत्तीसगडचे आरोग्यमंत्री श्याम बिहारी जायसवाल यांनी दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यांनी तातडीने जखमींना उपचार करून आर्थिक मदतीचे आदेश दिले आहेत. मंत्री जायसवाल यांनी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT