जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भावासह भाजपमध्ये प्रवेश

pandharpur politics : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार टेन्शन वाढलं आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने भावासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ajit pawar news
pandharpur politics Saam tv
Published On
Summary

ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला धक्का

अजित पवार गटाच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील समीकरण बदलणार

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. अजित पवारांच्या दोन बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सोलापुरात पंढरपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आणि त्यांचे बंधु राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ajit pawar news
Gadchiroli News: आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले अन् अनर्थ घडला; गोदावरीत बुडून दोघांचा मृत्यू

समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपची वाखरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळाल्याची सांगण्यात आलं आहे. काळेंच्या प्रवेशामुळे पंढरपुरात भाजपला बळ मिळाल्याची चर्चा आहे. आमदार अभिजीत पाटील यांच्या हाती राष्ट्रवादीचे सूत्रे आल्याने काळे गट भाजपमध्ये दाखल झाल्याचं बोललं जात आहे. आठ पैकी तीन जिल्हा परिषद गटामध्ये काळेंची निर्णायक ताकद आहे.

ajit pawar news
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी केल्यानंतरही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही; नेमकी काय चूक झाली?

माजी आमदाराच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

पुण्याच्या शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे , पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

ajit pawar news
महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद, दौंडचे आमदार राहुल कुल, जयश्रीताई पलांडे, उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे माजी आमदार संजय जगताप प्रवीण भैया माने, धर्मेंद्र खांडरे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com