Ladki Bahin Yojana : ई-केवायसी केल्यानंतरही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही; नेमकी काय चूक झाली?

Ladki Bahin Yojana explainer : काही महिलांना ई-केवायसी केल्यानंतरही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही. यामुळे अनेक महिला नाराज झाल्या आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana update Saam tv
Published On
Summary

काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणे सुरू

काहींची केवायसी करूनही डिसेंबरचा हप्ता रखडला

काही महिलांच्या लाडकीचे पैसे रखडण्याचे कारण आलं समोर

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणे सुरू झाला आहे. मात्र, काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करूनही हप्ता न मिळाल्याने नाराजी पसरली आहे. आता ई-केवायसी नव्हे, तर उत्पन्नासारखे इतर निकष महत्वाचे असल्याचे समोर आलं आहे. पात्र आणि अपात्र महिलांच्या फरकामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे रोखले गेल्याची माहिती मिळत आहे.

Ladki Bahin Yojana
आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

काही महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. डिसेंबरचा हप्ता मिळावा, यासाठी अनेक महिलांनी घाईघाईने केवायसी केली होती. परंतु काही महिला योजनेच्या निकषात बसत नसल्याने त्यांची केवायीसी होऊनही हप्ता मिळालेला नाही. केवायसी करताना महिलांना त्यांच्या वडील आणि पतीचं उत्पन्न सांगावं लागतं. ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा अधिक असेल, त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाहीये. याआधी अनेक महिलांनी अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सरकारने लाभार्थी महिलांना केवायसी बंधनकारक केली होती.

Ladki Bahin Yojana
शिक्षक ते BMC नगरसेवक! उमेदवारी अर्ज भरायला खिशात पैसा नव्हता; ओवैसींनी ताकद दिली, तरुणाने निवडणूक जिंकून दाखवली

सरकारने म्हटलं होतं की, 'योजनेसाठी केवायसी ३१ डिसेंबरपर्यंत करण्याचं आवाहन लाडक्या बहि‍णींना केलं होतं. केवायसी करणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आता केवायसी करण्याची अंतिम तारीख निघून गेली आहे. त्याचबरोबर अनेक महिला आता निकषात बसत नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आता पात्र महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. त्यांचं आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष लागलं आहे.

Ladki Bahin Yojana
एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह; प्रत्येकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या

लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. देशभरात प्रसिद्ध असलेल्या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. महायुती सरकारकडून मकरसंक्रांतीच्या दिवशी डिसेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी काही जणांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com