शिक्षक ते BMC नगरसेवक! उमेदवारी अर्ज भरायला खिशात पैसा नव्हता; ओवैसींनी ताकद दिली, तरुणाने निवडणूक जिंकून दाखवली

BMC Corporator Vijay Ubale : एमआयएमचे नगरसेवक विजय उबाळे यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही तरुण नगरसेवकाने कमाल केली आहे.
 vijay ubale
bmc corporator vijay ubale Saam tv
Published On
Summary

मुंबईच्या गोवंडीत एमआयएमची कमाल

एमआयएमचे विजयी उमेदवार उबाळेंची जोरदार चर्चा

विजय उबाळे यांचं सर्वत्र कौतुक

मुंबई : एमआयएमच्या मुंबईतील बौद्ध उमेदवाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. एमआयएमचे उमेदवार विजय उबाळे हे मुंबईतील वॉर्ड क्रमांक १४० मधून ४९४५ मते घेत विजयी झालेत. त्यांनी या प्रभागातील एकूण २५,९५० मतापैंकी २० टक्के मते मिळवली. मुंबईतील हा प्रभाग मुस्लिम बहुल आहे. ५० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार या प्रभागात आहेत. मुस्लिम बहुल भागात जिंकून आलेल्या विजय उबाळे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

विजय उबाळे यांनी मुंबईच्या सोमैय्या कॉलेजमधून बीएससीची पदवी प्राप्त केली. ते पेशाने शिक्षक आहेत. ते गोवंडीत खासगी कोंचिग क्लासेस चालवतात. शिक्षक असल्याने ते विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रसिद्ध होते. प्रभाग १४० चे एमआयएमचे अध्यक्ष दिलशाद अन्सारी यांचं म्हणणं आहे की, या प्रभागात हिंदू आणि मुस्लिम मतदारांची संख्या एकसमान आहे'. पेशाने शिक्षक असलेले उबाळे हे २०१२ सालापासून खासगी क्लासेस चालवतात. त्यांचा गणित विषयावर विशेष हातखंडा आहे.

 vijay ubale
धक्कादायक! IPS अधिकारी अन् तरुणी ऑफिसमध्ये नको त्या अवस्थेत; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं, VIDEO व्हायरल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उबाळे यांच्याकडे अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी पैसे नव्हते. प्रतिज्ञापत्र तयार करताना वकिलांनी ३००० रुपये मागितले. त्यावेळी विजय उबाळे यांनी उधारीवरच प्रतिज्ञापत्र तयार करून घेतलं. एमआयएम कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, 'मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी खासदार असदुद्दीन ओवैसी यांची प्रचार रॅली गेमचेंजर ठरली. या रॅलीमध्ये ५० हजारांहून अधिक लोक आले होते. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

 vijay ubale
आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

विजय उबाळे यांनी २०२४ साली विधानसभा निवडणुकीच्या काळात एमआयएम पक्षात प्रवेश केला. एमआयएमचे स्थानिक नेते आणि शिक्षक अतीक खान यांनी म्हटलं होतं की, 'विजय सर यांचा कोणता धर्म आहे, हे महत्वाचं नाही. परंतु त्यांचं भारतीय संविधानावर ज्ञान चांगलं आहे. त्यांच्यासाठी बॅरिस्टर असुदुद्दीन ओवैसी हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे'.

 vijay ubale
कैसा हराया? आता संपूर्ण शहर हिरवं करू; निवडणूक जिंकताच MIMच्या नगरसेविकेचं ओपन चॅलेंज, VIDEO

तत्पूर्वी, वॉर्ड क्रमांक १४० हा दोन विधानसभा मतदारसंघाशी विभागला गेलेला आहे. त्यातील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे आमदार आहेत. तर दुसऱ्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे सना मलिक या आमदार आहेत. वॉर्डातील दोन्ही प्रमुख पक्षाच्या लढाईत तिसरा पक्ष म्हणजे एमआयएम पक्षानेच बाजी मारली. या वॉर्डात विजय उबाळे यांनी एकहाती विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com