आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

pune corporater : पुण्यात सफाई कामगार महिलेचा मुलगा नगरसेवक झाला आहे. भाजपच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली होती.
pune latest news
pune news Saam tv
Published On
Summary

पुण्यातील निवडणुकीत अमर आवळेंना घवघवीत यश

अमर यांची महानगरपालिकेत सफाई कामगार

मुलगा नगरसेवक झाल्याने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलंय. या यशोगाथेमध्ये पुण्यातील प्रभाग क्रमांक 27 साने गुरुजी नगरमधून महेश उर्फ अमर विलास आवळेंचा मोठा वाटा आहे. आवळे हे गेल्या 25 वर्षांपासून पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून सेवा देणाऱ्या आई-वडिलांचे सुपुत्र आहेत. सामान्य कुटुंबातून पुढे येऊन ते नगरसेवक झालेत. त्यांच्या आई-वडिलांनी वर्षानुवर्षे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडलीये. मुलगा नगरसेवक झाल्याचा आनंद साजरी करत असताना जीवनातील संघर्ष आठवताना त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. आई-वडिलांनी केलेल्या कष्टांचं फळ म्हणून मुलगा नगरसेवक झाल्याचा अभिमान आणि आनंद दोघांच्या चेहऱ्यावर झळकतोय.

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तब्बल अडीच ते तीन हजार इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले. यातून भाजपने इलेक्टिव्ह मेरिट तसेच पक्षासाठी केलेलं काम आणि स्थानिक प्रतिनिधित्व आणि क्षमता पाहून उमेदवारी देण्याचा ठरवलं. पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या ठिकाणी भाजपने चार उमेदवार दिले.

pune latest news
ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याने हाती धरलं शिवसेनेचे 'धनुष्यबाण'

पुणे शहर भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह स्मिता वस्ती आणि लता गौडा या दोन महिलांना सुद्धा उमेदवारी दिली. यातील आणखी एक नाव म्हणजे अमर आवळे. उमेदवारी जाहीर होताच भाजपातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 27 मध्ये सुद्धा असंच काही चित्र पाहायला मिळाले. "शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे आम्ही नाराज आहोत" अशी टीका पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याने अमर आवळे याचं नाव न घेता केली आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले.

निवडणुकीचे तिकीट मिळाल्यामुळे अमर आवळे येणे प्रचार करायला सुरुवात केली. लहानपणापासून अमर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जोडला गेला. कालांतराने त्याने भाजपमध्ये असलेल्या धीरज घाटे यांच्यासोबत अनेक ठिकाणी वावरायला सुरुवात केली. पुण्यातील साने गुरुजीनगर या ठिकाणी राहणाऱ्या घाटे यांच्यासोबत तो त्यांची सावली म्हणून काम करायला लागला. काय दिवसातच त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि स्थानिक पातळीवर विविध काम करू लागला. महापालिका निवडणुकीसाठी धीरज घाटे यांनी स्वतः अमर याचे नाव पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सुचवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीत प्रभागातील जनतेने अमरच्या बाजूने दिलेला कौल त्याला आता महापालिकेच्या सभागृहात फायद्याचा ठरणार आहे.

आई वडील सफाई कर्मचारी आणि मुलगा नगरसेवक

अमर आवळे हा सध्या पुण्यातील साने गुरुजी नगर मध्ये असलेल्या एका चाळीत राहिलाय. अवघ्या दोन खोलीचं हे घर असलं तरीसुद्धा येथील प्रत्येक माणसाला अमर ने जोडलं आहे. अमर यांच्या वाटचालीत मोठे योगदान आहे ते म्हणजे त्याच्या आई-वडिलांचे. आई वडील हे दोघेही पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. सध्या राहत असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या एका झोपडपट्टीत अमर त्याच्या दोन बहिणी आणि आई वडील हे यापूर्वी राहत होते. रस्त्यावरची साफसफाई करून मिळालेल्या पगारात आई-वडिलांनी अमरचे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणात फारसा रस न दाखवल्यामुळे आई-वडिलांनी अमरला त्याला जे करायचं आहे ते करण्यासाठी परवानगी दिली या गोष्टीचा अमरने आज सोनं करून दाखवलं आहे.

pune latest news
धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

आईच्या डोळ्यात अश्रू, वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान

"ज्या भागात आपण रोज झाडू मारतो त्याच भागात हे काम करत असताना मी प्रत्येक जणाला अमर साठी एक मत द्या हे सांगत होते आणि आज अमर जे काही आहे ते जनतेमुळे आहे तसेच त्याला मिळालेल्या धीरज घाटे यांच्या आशीर्वादामुळे आज तो उभा आहे. अत्यंत संघर्षाची परिस्थिती मधून त्यावर मात करत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत," असं अमर ची आई सांगताना तिच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळले.

अमर यांच्या आई म्हणतात, "गेल्या काही वर्षांपासून मी महापालिकेची सफाई कामगार आहे तसेच अमरचे वडील सुद्धा हेच काम करत होते पण एके दिवशी त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आणि आजही यांच्या डाव्या डोळ्याने त्यांना कमी दिसतं."

"आम्ही जनतेचे कायम ऋणी राहू कारण आमच्यासारख्या लोकांच्या मुलाला आज जनतेने नगरसेवक बनवलं आहे. जिथे मदत लागेल तिथे आमचा मुलगा वेळ पाहत नाही काळ पाहत नाही पण सदैव उभा राहतो याचाच आशीर्वाद जनतेने त्याला मतदानातून दिला असावा,"असं अमरचे वडील अभिमानाने सांगतात. ज्या महापालिकेसाठी साफसफाई केली त्यात सभागृहात आता अमर नगरसेवक म्हणून बसणार आहे याचा आनंद त्याच्या आई-वडिलांना गगनात मावेनासा झाला आहे.

pune latest news
दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटला; व्यावसायिकासह वडिलांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

प्रभाग २७ मध्ये भाजपने थेट पॅनल 'मारलं'

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने तब्बल 18 प्रभागात पॅनल निवडून आणलं. आतील एक प्रभाग म्हणजेच पुण्यातील प्रभाग क्रमांक 27. अमर आवळे यासह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, लता गौडा आणि स्मिता वस्ती असे चौघेजण या प्रभागाचे नेतृत्व महापालिकेच्या सभागृहात करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com