धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

Mumbai Firing news : मुंबई गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. भररस्त्यात तरुणांकडून इमारतीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने नागरिक दहशतीत आहेत.
Mumbai news
ANDHERI FIRINGsaam rv
Published On
Summary

मुंबईत घडली गोळीबाराची घटना

निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत गोळीबार

गोळीबारात कुणीही जखमी नाही

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महापालिका निवडणुका होऊन काही तास उलटताच गोळीबाराची घटना घडली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत शहरात रस्त्यावरून इमारतीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Mumbai news
MIM चा भाजपला मोठा फटका; निवडणुकीत महापालिकेवरील सत्ता गेली? बॅकफूटवर जाण्याची कारणे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. लोखंडवाला बॅक रोड परिसरामध्ये अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरलं आहे. गोळीबार करणारे तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

Mumbai news
महापालिका निकालानंतर मोठा राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

गोळीबाराची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. ओशिवरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि प्रत्यक्षदर्शींची बोलून घटनेची माहिती घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळावर दोन बुलेट सापडल्या आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार केलेल्या इमारतीला घेरलं. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. गोळीबार करणारे तरुण कोण होते, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर तरुणांनी गोळीबार का केला, याचेही कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. या गोळीबारामागे कोणत्या गँगचा हात आहे का, हे देखील तपासले जात आहेत.

Mumbai news
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; दोन-तीन जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही. परंतु या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर नागरिक दहशतीत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com