

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत
भटक्या कुत्र्यांनी घेतला तिघे जणांना चावा
भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. इंदिरानगर आणि टिटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांनी दोन ते तीन जणांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक लहान मुलांना चावा घेतल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी व सायंकाळच्या वेळेत कुत्र्यांचे कळप रस्त्यांवर फिरत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. मुलांना शाळेत पाठवताना आणि खेळायला सोडताना पालकांना मोठी चिंता वाटत असल्याचे चित्र आहे. काही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात केडीएमसी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढत आहे.
या प्रकरणात भटक्या कुत्र्याच्या चाव्याने जखमी झालेल्या एका मुलाच्या वडिलांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत ‘आमच्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?’ असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी तात्काळ निर्बंधात्मक आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे कल्याणमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, केडीएमसी प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहून नेमकी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.