ऐन ZP निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; माजी मंत्र्याच्या मुलाची भाजपमध्ये एन्ट्री

uddhav thackeray News : ऐन ZP निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसलाय. माजी मंत्र्याच्या मुलाने भाजपमध्ये एन्ट्री केली आहे.
uddhav thackeray news
uddhav thackeray Saam tv
Published On
Summary

भाजपकडून जिल्हा परिषदांच्या निवडवणुकीला सुरुवात

विरोधक महापौरपदाच्या जुळवाजुळवीत गुंग असताना भाजपने दिला मोठा हादरा

माजी गृहमंत्र्यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

सचिन कदम, साम टीव्ही

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने जिल्हा परिषदांच्या निवडवणुकीला जोरदार तयारी सुरू केली आहे. काही जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची घोषणा होऊ लागली आहे. तर काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गट स्वबळावर लढण्याचे चिन्ह दिसत आहे. विरोधक महापालिका निवडणुकीच्या विश्लेषणात व्यग्र असताना भाजपने ठाकरे गटाचा बडा नेता फोडला आहे.

कोकणातही भाजप आणि शिंदे गटाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीदरम्यनान भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा हादरा दिलाय. माजी गृहराज्यमंत्री तथा महाडचे माजी आमदार प्रभाकर मोरे यांचे पुत्र अमित मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमित मोरे यांच्या रुपाने भाजपने रायगडच्या महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

uddhav thackeray news
दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटला; व्यावसायिकासह वडिलांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशिल पाटील यांच्या उपस्थिती पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. अमित मोरे हे महाडच्या विन्हेरे जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी सदस्य आहेत. भाजप, राष्ट्रवादी युतीकडून अमित मोरे महाडच्या विन्हेरे जिल्हा परिषद मतदार संघातुन निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

uddhav thackeray news
महापौरपदावरून ट्विस्ट ! भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

uddhav thackeray news
कैसा हराया? आता संपूर्ण शहर हिरवं करू; निवडणूक जिंकताच MIMच्या नगरसेविकेचं ओपन चॅलेंज, VIDEO

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com