Mamata Banerjee  saam tv
देश विदेश

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या निवडणूकीत मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या निवडणूकांचा काल निकाल लागल्यानंतर मोठा राजकीय ट्विस्ट पहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार नसल्याची ठाम भूमिका मांडली आहे.

Shruti Vilas Kadam

Mamata Banerjee news : पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. बंगालमध्ये मुख्यमंत्रीचा चेहरा कोण असणार शपथविधी सोहळा कधी असणार याबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आणि निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'आमचा पराभव झालाच नाही, तर मी राजीनामा का द्यायचा असा प्रश्न करत ममता बॅनर्जी यांनी खळबळ उडवून दिली आहे. विधान सभेच्या निकालानंतर आज ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, "आम्ही निवडणूक हरलो नाही; तर,आमचा पराभव केला गेला. भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकून आपला विजय मिळवला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी परिषदेत केला.

निकालाच्या या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ५ मे रोजी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. पराभवानंतर त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. आमचा पराभव झालाच नाही तर, मी राजीनामा का द्यायचा ,” अशा त्या म्हणाल्या. त्याच्या या विधानामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पेच निर्माण झाला आहे.

पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "आम्हाला हरवण्यात आलं आहे. जर भाजपने निष्पक्ष निवडणुकीद्वारे विजय मिळवला असता, तर आमची कोणतीही तक्रार नसती, मात्र "आम्ही हरलेलो नाही. भाजपने हा विजय चोरला आहे." त्यांनी असा आरोप केला की, मतदार यादीतून ९० लाख नावे वगळण्यात आली होती. "जेव्हा आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली, तेव्हा ३२ लाख लोकांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आली. पण यानंतर आणखी ७ लाख लोकांची नावं जोडली गेली, या नावांविषयी आम्हाला कल्पना नव्हती.

त्या म्हणाल्या, "माझ्या संपूर्ण आयुष्यात मी अशा प्रकारची निवडणूक कधीच पाहिली नाही. तसेच, २००४ नंतर मी असा लोकांचा छळही कधी अनुभवला नाही. हे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे." त्यांनी पुढे आरोप केला, "पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला पराभूत करण्याचा कट रचला. हा विजय मिळवण्यासाठी भाजपने शक्य त्या सर्व युक्त्यांचा वापर केला आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला."

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागला. भारतीय जनता पक्षाने २०६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले, तर तृणमूल काँग्रेसला ८१ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्याने तिची स्थिती अधिकच कमकुवत झाल्याचे दिसून आले. एकीकडे भाजप विजयाचा जल्लोष साजरा करत असताना, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसकडून निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे राज्यातील मोठ्या घडामोडी आणि राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात कोयत्याने सपासप वार, नंतर दगडाने ठेचून तरुणाची हत्या

भीषण अपघाताचा थरार; ४ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ जणांचा जागीच मृत्यू

सोनं ३ हजारांनी स्वस्त, चांदी ७ हजारांनी घसरली, आठवडाभरात मार्केट जाम, सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Bhagyashtree Mote Photos: तुझं सौंदर्य पाहून ओठातून शब्दच फुटेना...

Chanakya Niti: विषासमान असतात या ३ चूका, यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच बदला या सवयी

SCROLL FOR NEXT