पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत ममता बॅनर्जी यांचा अनपेक्षित आणि दारुण पराभव झाला आहे. अनेक वर्षे राज्याच्या सत्तेवर वर्चस्व राखणाऱ्या ममता बॅनर्जी यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यांचेच एकेकाळचे सहकारी असलेले सुवेंदु अधिकारी यांचा विजय झाला असून देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
एकीकडे भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार विजय संपादन करत तृणमूल काँग्रेसला धोबी पछाड केले. तब्बल 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या विधानभवनावर झेंडा फडकवला आहे. ममता बॅनर्जी यांची सत्तेसोबत आमदारकीही गेली आहे. भवानीपुर मतदारसंघातून ममत बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,111 मतांनी पराभव केला.
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर भाजपने जोरदार जल्लोष करायला सुरुवात केली. शुभेंदु अधिकारी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. ममता बॅनर्जी यांचा पराभव होणे गरजेचे होते. हा विजय बंगालच्या एकजुटीचा असल्याची प्रतिक्रिया शुभेंदु अधिकारी यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.