Telangana Politics: सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरात तंत्र-मंत्र विधी; मुख्यमंत्र्यांच्या आरोपानं खळबळ

Revanth Reddy Targets BRS: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलाय. BRS नेत्यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांमध्ये पुजा करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
Revanth Reddy allegations about tantrik rituals in Karnataka and Tamil Nadu
Revanth Reddy allegations about tantrik rituals in Karnataka and Tamil Nadu
Published On
Summary
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात नवा वाद

  • काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी तंत्र-मंत्र विधी केल्याचा दावा

  • कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांमध्ये कथित विधी केल्याचा दावा

तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारण तापलंय. काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी तंत्र-मंत्र विधी करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलाय. रेवंत रेड्डी यांनी हा आरोप भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या नेत्यांवर केलाय. बीआरएसच्या नेत्यांनी राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांची दुर्दशा आणि काँग्रेस सरकारचे पतन व्हावे यासाठी प्रार्थना केली.

Revanth Reddy allegations about tantrik rituals in Karnataka and Tamil Nadu
Varanasi : आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार! प्रवाशाची तपासणी करताना पिस्तुलातून गोळी सुटली; मोठा अनर्थ टळला

बीआरएस आमदार टी. हरीश राव यांचे नाव न घेता, कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देऊन तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री संगारेड्डी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष बी. महेश कुमार गौड यांनीही 4 ऑगस्ट रोजी आरोप केला होता की, हरीश राव यांनी राज्यात पाऊस थांबवण्यासाठी पूजा (तंत्र-मंत्र) केल्या होत्या.

Revanth Reddy allegations about tantrik rituals in Karnataka and Tamil Nadu
देशातील 4 कोट्याधीश मुख्यमंत्री, कोणत्या राज्याच्या CM पहिल्या क्रमांकावर? थलपती विजयची संपत्ती किती? आकडेवारी आली समोर

मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं

हरीश राव यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी खोटे बोललेत. ते म्हणाले की, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची अपूर्ण कर्जमाफी आणि खतांची टंचाई यांसारखे मुद्दे त्यांनी सातत्याने मांडल्यामुळे मुख्यमंत्री अशी विरोधात वक्तव्ये करत आहेत. पण ते शेतकरी, बेरोजगार तरुण आणि विद्यार्थ्यांचा आवाज उठवत राहतील. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांविरोधात मानहानीचा खटला दाखल करू असा दावाही त्यांनी केलाय .

Revanth Reddy allegations about tantrik rituals in Karnataka and Tamil Nadu
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com