Face Care: हल्दी-बेसन-दही नाही! ग्लोइंग स्किनसाठी घरच्या ३ पदार्थांपासून बनवा 'हा' फेसपॅक

Shruti Vilas Kadam

तांदळाचा पेस्ट तयार करा

सुमारे ४ ते ५ चमचे तांदूळ धुऊन पाण्यात चांगले शिजवून घ्या. त्यात थोडे पाणी ठेवून रात्रभर झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी मऊ पेस्ट तयार करा.

Face Care | Saam Tv

बटाट्याचा रस मिसळा

तयार तांदळाच्या पेस्टमध्ये सुमारे एक चमचा कच्च्या बटाट्याचा रस मिसळा. बटाटा किसून स्वच्छ कपड्याने त्याचा रस काढता येतो.

Face care | Saam TV

बदामाचे तेल घाला

आता मिश्रणात एक चमचा बदामाचे तेल घालून सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करा. पेस्ट फार पातळ ठेवू नका, जेणेकरून ती चेहऱ्यावर सहज लावता येईल.

Face Care | Saam tv

चेहऱ्यावर कसा लावाल?

सुरुवातीला चेहरा फेसवॉश किंवा पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर फेसपॅकची पातळ लेयर चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १५ मिनिटे ठेवून द्या.

Face Care | Saam Tv

त्वचा मऊ होण्यास मदत

तांदूळ आणि बदामाचे तेल त्वचा मऊ ठेवण्यास मदत करू शकतात. फेसपॅक धुतल्यानंतर त्वचा अधिक सॉफ्ट आणि फ्रेश वाटू शकते.

Face Care | Saam Tv

थकलेली त्वचा दिसेल फ्रेश

चेहरा निस्तेज किंवा थकलेला दिसत असल्यास हा फेसपॅक त्वचेला फ्रेश आणि क्लीन लुक देण्यास मदत करू शकतो. बदामाचे तेल त्वचेतील ओलावा टिकवण्यासही मदत करते.

Face Care | Saam tv

आठवड्यातून एकदाच वापरा

हा फेसपॅक रोज लावण्याची गरज नाही. आठवड्यातून एकदा वापरणे पुरेसे आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल. त्वचेची समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Face Care | Saam Tv

Healthy Fruits: सफरचंद-पेरुपेक्षाही 'ही' ५ फळं आहेत अधिक फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितली यादी

Healthy Fruits | Saam Tv
येथे क्लिक करा