Shruti Vilas Kadam
या यादीत आवळ्याला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. आवळा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असून रोगप्रतिकारशक्ती, हृदय, पचनसंस्था आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देण्यास मदत करतात.
जांभूळ हे अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध फळ आहे. फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते.
तसेच रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यासाठीही जांभूळ आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि फोलेट यांसारखे पोषक घटक असतात. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
कीवीमध्ये व्हिटॅमिन सीसोबत फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ई आढळते. नियमित आहारात कीवीचा समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती, पचनक्रिया आणि त्वचेच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.
डाळिंब पॉलीफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरही असते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकते.