हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ज्योतीची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक गुपितं उघड होत आहेत. ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. पहलगाम हल्ल्याच्या आदी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात गेली होती. तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होण्यपूर्वी ज्योती पहलगाममध्ये गेली होती.
ज्योती मल्होत्राचे फक्त पाकिस्तानशीच नाही तर चीनसोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तिने काही महिन्यांपूर्वी चीनला भेट दिली होती. चीनला भेट देण्यापूर्वी ती पाकिस्तानात गेली होती. ज्योती मल्होत्रा या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पालगाम हल्ल्याच्या तीन महिने आधी पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी दानिशने ज्योतीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचेही समोर आले आहे. दानिश हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयसीसशी संबंधित असल्याचे सांगितले जाते आहे. याच दानिशसोबत ज्योतीची खूपच खास मैत्री आहे. ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे.
हिसारचे एसपी शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यापूर्वी युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती आणि तिने चीनला देखील भेट दिली होती. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ज्योतिला त्यांचा एजंट बनण्यासाठी तयार करत होत्या. त्यांनी खुलासा केला की ज्योती मल्होत्राने अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी ती पाकिस्तानात गेली होती. याशिवाय तिने चीनलाही भेट दिली आहे. चीन भेटीचा उद्देश अद्याप कळलेला नाही. तिच्या चीन भेटीदरम्यानचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला भारतातील संवेदनशील माहिती दिल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योतीला अटक करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक शेष पॉल वैद्य यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, 'पाकिस्तानी उच्चायोग कर्मचारी (कदाचित आयएसआय एजंट) दानिशने हनी ट्रॅप केलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा जानेवारी २०२५ मध्ये पहलगामला गेली हा केवळ योगायोग आहे का?' ती आयएसआय हँडलर्सना संवेदनशील माहिती देत होती असे सांगितले जात आहे. आपल्या गुप्तचर संस्था सहसा अशा लोकांवर लक्ष ठेवतात जे वारंवार शत्रू देशांना किंवा पाकिस्तान, चीन आणि आता बांगलादेशसारख्या उच्चायुक्तांना भेट देतात.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.