Pakistan सरकारला दहशतवाद्यांचा पुळका! पाक उभारणार हाफिजचा मदरसा, दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र सुरुच

Pakistan News : पुन्हा एकदा पाक सरकारचा निर्लज्जपणा उघड झालाय. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सरकार कोणत्या थराला जाऊ शकतं हे आता जगासमोर आलयं. आता पाकिस्तान दहशतवाद्यांना कशाप्रकारे मदत करतोय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Pakistan
Pakistan Saam Tv
Published On

सुप्रीम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

भारताच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या मुरीदकेमधील दहशतवादी तळांना बेचिराख करण्यात आलं. मात्र पाकनं सुरुवातीला हल्ला झालाच नसल्याचा बनाव केला. आता विध्वंसाचे सत्य बाहेर येताच पाकनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. पाक सरकार आता हाफिजचं मुरीदकेमधील हेच दहशतवादी तळ पुन्हा उभारणार आहे. 27 हेक्टरमधील या दहशतवादी अड्ड्यात तरुणांना धार्मिक आणि दहशतवादी प्रशिक्षण दिलं जातं. मात्र हे तळं दहशतवादी प्रशिक्षण केंद्र नसल्याची मुक्ताफळे मुरीदके कॅम्पच्या प्रशासक मोहम्मद आझमने उधळलेत.

दहशतवादाचे मदरसे

- मुरीदके दहशतवादी तळ नाही

- कॅम्पमध्ये फक्त धार्मिक शिक्षण, दहशतवाद पसरवत नाही

- कॅम्पमध्ये मशीद, शाळा, वसतिगृह, क्लिनिकची व्यवस्था

- तरुणांसाठी मुरीदके कॅम्पमध्ये चालते व्यावसायिक प्रशिक्षण

- मुरीदके कॅम्पवर पाकिस्तान सरकारचं लक्ष

- संस्थेसाठी स्वतंत्र सरकारी अधिकारी नियुक्त केलेत

Pakistan
Beed Crime : तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू...! बीडमध्ये पुन्हा गुंडाराज, परळीत मारहाण झालेल्या तरुणाने सांगितली आपबिती

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची प्रचंड वाताहात झाली. भारतानं आधी सिंधू जल करार बंद करून तिथल्या शेती उद्योगाला फटका दिला. मग व्यापार बंदी करून पाकचं कबरंडच मोडलं. त्यात कंगाल पाकिस्तानने आयएमएफकडून 3 अब्ज डॉलरचं कर्ज घेतलयं. मात्र दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोसण्यातच पाकची तिजोरी खाली होणारेय.

Pakistan
Beed News : शिवराज दिवटेच्या मारेकऱ्यांवर मकोका लावा, बीडच्या बड्या नेत्याची मागणी

आता हाफिजचं मुरीदकेमधील दहशतवादी तळ पुन्हा उभारणार असल्यानं पाक सरकार पुन्हा गाळात जाणार आहे. जगभरात दहशतवादाला विरोध असताना पाकमात्र दहशतवाद्यांना उराशी कवटाळून बसलाय. हे जगांच्या शांततेसाठी गंभीर गोष्ट आहे.

Pakistan
Beed Crime : मारहाणीनंतर पाय धरायला लावले, बीडच्या शिवराजला मारहाण करणारी पोरं कराड गँगची?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com