
काश्मीरच्या नंदनवनात अर्थात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधलं तणाव अधिक वाढलं. एकमेकांच्याविरोधात घेतलेल्या निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी चिघळत चाललं आहे. भारतासह पाकिस्तानच्याही हालाचालींना आता वेग आला आहे.
पाकिस्तान एलओसी रेषेवर युद्धसराव करीत असून, अनेक देशांकडून पाकिस्तानला पाठिंबा मिळालेला आहे. ज्यात चीनचाही समावेश आहे. भारताच्या राफेलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून एअर टू एअर क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत. अशा परिस्थीतीत भारताचा सामना करण्यासाठी चीनकडे कोणती क्षेपणास्त्रे आहेत. पाहुयात.
पीएल-८ (PL-8)
इस्रायलच्या ‘पायथॉन-३’ क्षेपणास्त्रावर आधारित आहे. १९८८ पासून चीनच्या वायुदलात कार्यरत. ‘पायथॉन-३’ हे राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम्सने विकसित केला आहे. हे क्षेपणास्त्र ३.५ मॅक वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आहे. तर, या क्षेपणास्त्राची रेंज २० किमी आहे. मुख्यतः जवळच्या चकमकींसाठी उपयुक्त.
पीएल-१० (PL-10)
पीएल-८ च्या मर्यादा ओळखून विकसित केली आहे. ‘इमेजिंग इन्फ्रारेड सीकर’, ‘थ्रस्ट-व्हेक्टरिंग’ आणि ‘लेसर प्रॉक्सिमिटी फ्यूज’सह. ९० अंशात वळण्याची क्षमता, रडार जॅमिंगपासून वाचवण्यास सक्षम आहे.
पीएल-१२ (PL-12)
‘बियॉन्ड व्हिज्युअल रेंज’ (BVR) हे क्षेपणास्त्र एअर टू एअर हल्ला करते. अमेरिकन AIM-120 AMRAAM आणि रशियन R-77 च्या तोडीचे आहे. हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी रशियाच्या विम्पेल एनपीओ आणि अॅगेट यांनी मदत केली.
पीएल-१५ (PL-15)
अत्याधुनिक सक्रिय रडार-मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. पीएल-१५ हे क्षेपणास्त्र २०१५-१७ च्या सुमारास चिनी हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. २०० किमीहून अधिक पल्ला गाठते. हे क्षेपणास्त्र मॅक ४च्या वेगाने उडू शकते. चीनच्या अत्याधुनिक विमानांवर तैनात.
पीएल-१७ / पीएल-२० (PL-17 / PL-20)
चीनच्या पीएल १७ क्षेपणास्त्राबद्दल सार्वजनिकरित्या फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या क्षेपणास्त्राला पीएल-२० असेही म्हणतात. लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, AWACS आणि टँकर विमानांवर हल्ला करण्यासाठी खास डिझाइन केलेले आहे. चीनने हे क्षेपणास्त्र गुप्त शस्त्र म्हणून सुरक्षित ठेवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.