तपासात व्हाईट कॉलर दहशतवाद्यांचा या कटामागील सहभाग
३२ कारबॉम्बद्वारे ४ शहरांमध्ये सिरीयल स्फोट करण्याचा कट
देशभरात एकाचवेळी स्फोट घडण्याची योजना
ही बातमी प्रत्येक भारतीयाला चिंतेत टाकणारी आहे. 10 नोव्हेंबरला संध्याकाळी कारमध्ये झालेला विध्वंसक स्फोट जसा झाला तसाच स्फोट त्याही पेक्षा विध्वसंक स्फोट हा तुमच्या शहरात देखिल होणार होता. आणि तोही एक नाही तर ३२ कारबॉम्ब देशभरात धडाधड फुटून रस्त्यारस्त्यावर रक्तमांसाचा चिखल करणार होते. होय होय तुम्ही जे ऐकलं ते अगदी खरंय. दिल्ली स्फोटातील तपासात जे समोर आलंय. ते ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल.
देशभरातील 4 शहरात 32 बॉम्ब एकाच वेळी फुटणार होते. आणि त्यासाठी 32 जुन्या गाड्यांचा वापर करण्यात येणार होता. त्यासाठी 2 गाड्यांमध्ये स्फोटकं ठेवण्यासाठी आणि स्फोटकांसाठी बदल करण्यात आले होते. यापैकी ज्या गाडीत स्फोट झाला ती EcoSport जप्त करण्यात आली. देशभरात बॉ्म्बस्फोटासाठी 8 दहशतवाद्यांच्या 4 टीम तयार करण्यात आल्या होत्या.
दिल्लीतील स्फोटात 13 लोकांचे मृत्यू तर शेकडो जखमी झाल्यानंतर देशभरात दहशतीचं वातावरण आहे. त्यामुळे या निष्ठूर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी तपास यंत्रणांनी आपल्या तपासाची चक्र फिरवत अनेक राज्यात छापासत्र सुरु केलं. त्यातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.
1. डायऱ्या जप्त
आरोपींच्या गुप्त डायऱ्या तपास यंत्रणांच्या हाती
2. २५ गुप्त नावं
डायरीत कोडवर्डसह २५ संशयितांची यादी उघड
3. आंतराष्ट्रीय दहशतवादी संघटना
JeM आणि AGuH चा या कटात थेट सहभाग.
4. पाच वर्षांचे षडयंत्र
बॉम्बस्फोटाची योजना गेल्या ५ वर्षांपासून सुरू
5. स्फोटात IEDचा वापर
IED बनवण्यासाठी लाखोंचे NPK खत खरेदी.
तपास यंत्रणांनी देशभरात केलेल्या छापेमारीत डॉ. उमर नबी आणि डॉ. मुजम्मिल यांच्या खोल्यामधून डायऱ्या जप्त केल्या या डायऱ्यामध्ये कटासंबंधी नोंदी आणि जम्मू-काश्मीर, फरीदाबाद मधील 25 लोकांची नावं सापडली. याच डायऱ्यामध्ये कोडवर्डचा वापर करण्यात आलाय. ज्यामध्ये तुर्कस्तानातील हँडलर उकासाचं नाव उघड झालं असून तो जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवत-उल-हिंद संघटनांमधील या कटासंबंधी दुवा होता.
या कटासाठी 2020 पासून योजना आखण्यात आली असून टेलिग्रामवर नंतर सिग्नल आणि सेशन सारख्या एन्क्रिप्टेड ॲप्सवर संवादासाठी २-४ लोकांचा एक गुप्त गट बनवण्यात आला स्फोटासाठी आरोपींनी 20 लाख जमवत IED बनवण्यासाठी ३ लाख रुपयांचे २० क्विंटल NPK खत गुरुग्राम आणि नूगमधून खरेदी केलं.
तपास यंत्रणांनी स्फोटानंतर केलेल्या कसून तपासात आता या आरोपींची त्यांना साथ देणाऱ्या बगलबच्च्यांची आणि देशाबाहेर बसलेल्या त्यांच्या आकांची सगळी कुंडली बाहेर काढायला सुरुवात केलीये. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करुन संबंधितांना थेट जल्हादाच्या हाती देण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या. विचार करा, जर देशभरात ३२ बॉम्बब्लास्ट झाले असते तर काय चित्र असतं?
देशाच्या राजधानीत झालेल्या कटाची योजना 5 वर्ष आधीपासून सुरु होते. आणि देशात 32 कार बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी 8 जणांची टिम तयार होते आणि हे सगळं आपल्याला देशाच्या राजधानीत स्फोट झाल्यानंतर कळतं त्यामुळे आपलं इंटिलिजेन्स आणि तपास यंत्रणांनी देखिल आत्मपरिक्षण करायलाच हवं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.