Madhya Pradesh Morena News Saamtv
देश विदेश

Poisonous Gas Leak: 'रक्षाबंधना'दिवशी काळाचा घाला! फूड फॅक्टरीमध्ये विषारी वायू गळती; तीन भावांसह ५ जणांचा मृत्यू

Gangappa Pujari

MP Gas Leak News: मध्य प्रदेशमधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या मुरेनामध्ये एका फूड फॅक्टरीमध्ये गॅस गळती झाली. या घटनेत फॅक्टरीत काम करणाऱ्या पाच कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आणि अग्रिशामक दलाचे जवान परिसरात दाखल झाले आहेत. (MP Gas Leak)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुरेना जिल्ह्यातील जरेरुआ परिसरात साक्षी फूड कंपनीची (Sakshi Food Fectory) फॅक्टरी आहे. बुधवार (३०, ऑगस्टल) कारखान्यातील 9 फूट खोल टाकी साफ करण्यासाठी दोन मजूर उतरले होते. टाकीतील विषारी वायूची गळती झाल्याने दोन्ही मजुरांना त्रास होऊ लागला.

प्रकृती बिघडल्याने त्या दोघांन वाचवण्यासाठी आणखी तीन मजूर एकापाठोपाठ एक टाकीत उतरले. दुर्देवाने टाकीमध्ये उतरलेल्या सर्व ५ मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचाही समावेश आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृत मजुरांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी पाच जणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT