Sushama Andhare News: सुषमा अंधारेंची राजकीय 'राखी'; शिंदेंसह ४० भावांना राखी बांधण्याची इच्छा केली व्यक्त

Sushama Andhare on Shinde Group: सुषमा अंधारेंची राजकीय 'राखी'; शिंदेंसह ४० भावांना राखी बांधण्याची इच्छा केली व्यक्त
Sushama Andhare on Raksha Bandhan
Sushama Andhare on Raksha BandhanSaam Tv
Published On

>> अक्षय बडवे

Sushama Andhare On Raksha Bandhan: आज देशभरात भाऊ आणि बहिणींच्या अतुट नात्यांचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन साजरा केला जात आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील त्यांच्या भावंडांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उ

द्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांसाठी सुषमा अंधारे यांनी राखी खरेदी केली असल्याचं सांगितलं आहे.

Sushama Andhare on Raksha Bandhan
Political News: 'इंडिया आघाडी'च्या मुंबईतील बैठकीआधीच मोठी राजकीय घडामोड; मायावतींनी घेतला मोठा निर्णय

रक्षाबंधनानिमित्त बोलताना अंधारे म्हणाल्या आहेत की, ते 40 जण माझे भाऊ, त्यांना राखी बांधण्याची माझी इच्छा आहे. किमान एक तरी भावाने आज माझ्याकडे रक्षाबंधनासाठी यावे, अशी भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

याआधी त्यांनी ट्विटवर मंगळवारी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्या म्हणाल्या आहेत की, ''कुठल्याही बहिणीला आपला भाऊ राखी पौर्णिमेला सोबत असावं, असं मनापासून वाटतं. महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करताना आम्ही विरोधक म्हणून भूमिका न मांडता भाऊ म्हणून भूमिका मांडत राहीलो. कारण यातल्या काहींनी निश्चितपणे अक्षम्य असा अपराध केला आहे.''   (Latest Marathi News)

Sushama Andhare on Raksha Bandhan
NCP Crisis News: शरद पवार आणि अजितदादा एकच, भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र येऊ; रुपाली चाकणकरांचं मोठं विधान

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, ''पण काहींच्या हातून नकळत चुका घडल्या आहेत आणि चुका दुरुस्त होऊ शकतात. आमच्या सगळ्याच भावंडांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वाट चुकलेल्या भावांना सन्मार्गाचा रस्ता सापडो हीच सदिच्छा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com