Amazon Manager Killed In Delhi: दिल्ली हादरली! अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या, घटना CCTV मध्ये कैद

Delhi Crime News: डोक्यात गोळी लागल्याने अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मामा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Amazon Manager Killed In Delhi
Amazon Manager Killed In DelhiSaam tv

Delhi News: दिल्लीमध्ये (Delhi) अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यामध्ये गोळ्या झाडून हत्या (Amazon Manager Killed In Delhi) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य दिल्लीतील भजनपुरा परिसरातील सुभाष विहार येथे ही घटना घडली. अ‍ॅमेझॉनचा मॅनेजर त्याच्या मामासोबत दुचाकीवरुन जात होता. त्याचवेळी ५ जणांनी त्यांची दुचाकी रस्त्यात अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. डोक्यात गोळी लागल्याने अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मामा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Amazon Manager Killed In Delhi
Radhakrishn Vikhe Patil News : अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजप नेत्यांना फटका, मंत्रिमंडळ पायाभूत समितीतून राधाकृष्ण विखे पाटील यांची गच्छंती

मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत सिंग (३६ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरचे नाव आहे. मंगळवारी हरप्रीत सिंग हा आपला मामा गोविंद यांच्यासोबत दुचाकीवरुन जात होता. त्याचवेळी ५ जणांच्या टोळक्यांनी रस्त्यात त्यांची गाडी अडवली. त्यानंतर दोघांवर देखील गोळीबार करण्यात आला. हरप्रीतच्या डोक्यामध्ये गोळी मारण्यात आली असून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मामा गोविंदा यांना देखील गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

Amazon Manager Killed In Delhi
Political News: 'इंडिया आघाडी'च्या मुंबईतील बैठकीआधीच मोठी राजकीय घडामोड; मायावतींनी घेतला मोठा निर्णय

हल्ला केल्यानंतर ५ ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी जखमी गोविंद यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी गुरुतेग बहादुर रुग्णालयात हलवण्यात आले.

Amazon Manager Killed In Delhi
Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाच्या दिवशीच मोठी दुर्घटना; यमुना नदीत बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू

गोळीबाराची ही घटना घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरु आहे. हरप्रीत सिंगचे काका अक्षय यांनी सांगितले की, 'त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. हे का घडले ते मला माहीत नाही. त्याचे कोणाशीही वैर नव्हते. मी पोलिसांना सीसीटीव्हीचे दृश्य तपासण्याची विनंती केली आहे.'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com