Bhopal youth leader rape case latest update Saam TV
देश विदेश

मिटिंगसाठी फ्लॅटवर नेलं अन् बलात्कार केला; युवा नेत्याचे धक्कादायक कृत्य, राजकारणात खळबळ

Bhopal youth leader rape case latest update : भोपाळमध्ये एका राजकीय पक्षाच्या युवा नेत्याविरुद्ध २३ वर्षीय महिला पदाधिकाऱ्याने बलात्कार, मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

Namdeo Kumbhar

FIR against district youth leader Bhopal : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका राजकीय पक्षाच्या युवा आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसाविरुद्ध (युवा नेता) बलात्कार, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित २३ वर्षीय तरुणी देखील याच संघटनेत पदाधिकारी आहे.

पीडितेने आरोप केला आहे की, १० जुलै रोजी पक्षाच्या एका मोहिमेनंतर, आरोपी नेत्याने मिटिंग घेण्याच्या बहाण्याने तिला एका फ्लॅटवर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

२३ वर्षांच्या पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर एका पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसावर बलात्कार, मारहाण, गुन्हेगारी धमकी आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

आपल्या तक्रारीत त्या महिलेने आरोप केला आहे की, ती त्या नेत्यासोबत आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांसोबत संघटनेच्या एका मोहिमेत सहभागी झाली होती. १० जुलै रोजी दिवसभर प्रचाराशी संबंधित कामांमध्ये व्यस्त होती. पण त्यानंतर त्या नेत्यानं बैठक घेण्याच्या बहाण्याने एका फ्लॅटमध्ये नेले, असा आरोप आहे.

तक्रारदार महिलेने असा आरोप केला आहे की, त्या व्यक्तीने नंतर फ्लॅटमध्ये तिच्यावर हल्ला केला, तिला मारहाण केली, त्यानंतर जबरदस्ती तिच्यावर बलात्कार केला. तिने पुढे असा आरोप केला की, दुसऱ्या दिवशी सकाळी ती हॉस्टेलला परत जात होती, त्यावेळी त्या नेत्याने धमकी दिली. झालेला हा प्रकार कोणालाही सांगितला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. त्याशिवाय संघटनेतील काही सदस्य तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

SCROLL FOR NEXT