Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना पक्षातूनच आव्हान, अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी हालचाली; महाराष्ट्रातील मास्टरमाईंड कोण?

Legal notice against Sunetra Pawar latest news : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून अंतर्गत वाद उफाळला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस देत निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sunetra Pawar NCP national president controversy
Sunetra Pawar NCP national president controversy Saam TV
Published On

सुप्रीम मसकर, साम टीव्ही प्रतिनिधी

Sunetra Pawar NCP national president controversy : सुनेत्रा पवारांच्या अध्य़क्षपदाला त्यांच्याच पक्षातून आव्हान दिलं जातयं... पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांनी अध्यक्षपदाची निवड असैवंधानिक असल्याचा आरोप केलाय. मात्र यामागे महाराष्ट्रातलाच मास्टरमाईंड असल्याचं बोललं जातंय. कोण आहे हा नेता? सुनेत्रा पवारांना हटवण्यासाठी कोण हालचाली करतंय? पाहूयात या रिपोर्टमधून.

सच्चिदानंदांची नोटीस, पटेलांनी हात झटकले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आता थेट चव्हाट्यावर आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच आव्हान देण्यात आलंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत सुनेत्रा पवार यांना 9 जुलै रोजी कायदेशीर नोटीस बजावलीय. तसंच अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केलीय. मात्र सुनेत्रा पवारांची निवड आयोगाच्या नियमानुसार झाल्याचं पक्षांच्या प्रवक्त्यांनी सांगितलयं.

Sunetra Pawar NCP national president controversy
बुधवारी राज्यात कुठे कुठे पाऊस? आठवडाभराचा IMD चा अंदाज समोर, तुमच्याकडे पाऊस पडणार का?

सुनेत्रा पवारांनी अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी पक्षातील अवैध पत्रव्यवहारासंदर्भात आयोगाला पत्र लिहल्यानंतर पक्षात वर्चस्ववादाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता... त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते पटेल आणि तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा संघर्षाची चर्चा होती..आता पुन्हा सच्चिदानंद सिंह यांच्या पत्रामागे खासदार प्रफुल्ल पटेल असल्याची चर्चा रंगलीय. मात्र सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी कोणताही संबंध नसल्याचा दावा पटेलांनी केलाय.

Sunetra Pawar NCP national president controversy
PM Modi : पुतिन न्यूक्लियर अटॅक करणार होते, पण मोदींनी थांबवलं; जगाच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटिशीशी माझा कोणताही संबंध नाही

त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचं कोणतंही कारण नाही

सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झाली आहे

नोटीसआधी अनौपचारिक चर्चेत मी पक्षातील काही सुधारणेबाबत वैयक्तिक मत मांडलं होतं

माझ्या त्या मताचा आणि नोटीसचा कोणताही संबंध नाही

तर दुसरीकडे अमोल मिटकरींनी या नोटीशीचे थेट महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा आरोप केलाय...तर दादांच्या राष्ट्रवादीत सारं काही आलबेल नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय...

सच्चिदानंद यांच्या पत्रामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची चर्चा पुन्हा रंगू लागलीय. मात्र झारखंडच्या सच्छिदानंदांचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे? आणि थेट सुनेत्रा पवारांनाच पक्षांतर्गत आव्हान देण्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? याचीच सर्वांना उत्सुकता लागलीय.

गणेश कवडे, साम टिव्ही न्यूज, मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com