Lucknow couple suicide in front of Vande Bharat train Saam Tv
देश विदेश

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Lucknow Vande Bharat Tragedy : लखनऊमध्ये प्रेमप्रकरणातून एका प्रेमीयुगुलाने वंदे भारत ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • लखनऊमध्ये प्रेमीयुगुलांनी वंदे भारत ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या

  • तरुण विवाहित असूनही तरुणीसोबत संबंध सुरू होते

  • प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

  • पोलीस तपास सुरु

Lucknow couple suicide in front of Vande Bharat train लखनऊमध्ये एका प्रेमीयुगुलांनी वंदे भारत समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत तरुणीचे नाव दीपाली (वर्षे २५ ) तर मृत तरुणाचे नाव सूर्यकांत (३५) असे आहे. दोघेही सदर परिसरातील एकाच खासगी कार्यालयात काम करत होते. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत आणि दीपाली हे गायब असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. या दोघांच्या शोधात पोलीस तपास करत होते. तपास करताना पोलिसांना शनिवारी १० जानेवारी रोजी माहिती मिळाली की, आलम नगर स्टेशनजवळील जलालपूर रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे रुळाजवळ दोन मृतदेह पडले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेहांची ओळख पटवली.

हे मृतदेह सूर्यकांत आणि दीपालीचा होता. पोलिसांनी नागरिकांमध्ये चौकशी केली असता नागरिकांनी सांगितले की, या दोघांनीही धावत्या वंदे भारत समोर उडी मारत आत्महत्या केली. या दुर्घटनेत दोघांच्याही शरीराच्या चिंधड्या उडाल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या प्रेमीयुगुलांनी कोणाचंही ऐकलं नाही.

पोलिसांनी आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला असता धक्कादायक बाब समोर आली. सूर्यकांत हा विवाहित असून त्याला एक मुलगा होता. सूर्यकांत दीपालीसोबत पूर्वी ३ वर्ष नातेसंबंधात होता. त्यांनतर सूर्यकांतच दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं. त्यांच्या लग्नाला १० वर्ष उलटून गेल्यानंतरही सूर्यकांत आणि दीपाली एकमेकांना भेटत होते.

आत्महत्येच्या आधी तीन दिवस भाड्याने घर घेऊन एकत्र राहत होते. दोघांच्याही कुटुंबाला याची माहिती नव्हती. घटनास्थळी पोलिसांना सुमारे एक आठवड्याचे कपडे असलेल्या दोन बॅगा सापडल्या, ज्यावरून असे दिसून येते की या जोडप्याने स्थलांतर करण्याचा विचार केला असावा. महिलेकडे एक मोबाईल फोन सापडला , तर पुरूषाकडे दोन मोबाईल फोन, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सापडली. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेम संबंधातून ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT