PM Ujjawala Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पदरी निराशाच! गॅस सब्सिडीसाठी ४५ दिवसांची अट, अन्नपूर्णा योजनेचा निर्णय फक्त कागदावरच

PM Ujjawala Yojana Update: पीएम उज्जवला योजनेत महिलांंना सब्सिडी दिली जाते. राज्यातील महिलांना वर्षभरात ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. दरम्यान, अजूनही याबाबत अंबलबजावणी झालेली नाही.
 PM Ujjawala Yojana
PM Ujjawala YojanaSaam Tv
Published On
Summary

केंद्र सरकारची पीएम उज्जवला योजना

गॅस सिलिंडरसाठी सब्सिडी

शासन निर्णय फक्त कागदवरच

केंद्र सरकारने महिलांसाठी खास पीएम उज्जवला योजना सुरु केली आहे. यामध्ये महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका व्हावी, यासाठी मदत केली जाते. महिलांना मोफत गॅस सिंलिंडर कनेक्शन आणि सब्सिडी दिली जाते. केंद्र सरकारने २०१६ मध्ये ही योजना सुरु केली जाते. या योजनेत ९ सिलिंडरसाठी ३०० रुपयांची सब्सिडी दिली जाते.

 PM Ujjawala Yojana
LPG cylinder shortage: गॅस सिलिंडर संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

प्रत्येक सिलिंडरमागे ३०० रुपये मिळतात. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे आता महिलांना चुली पेटवाव्या लागत आहे. ग्रामीण भागातील महिलांना ४५ ते ५० दिवसानंतर सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळे महिलांची चांगलीच परवड होणार आहे. याचसोबत अन्नपूर्णा योजनेतील मोफत सिलिंडरचेही वाटप अजून झालेले नाही.

दरवर्षी १२ अनुदानिक गॅस सिलिंडर मिळतात. पाच किलोच्या गॅसची मर्यादा ३४ सिलिंडर आहे. परंतु सध्या उद्धामुळे तुटवडा आहे. त्यामुळे दर महिन्याला किमान १ गॅस सिलिंडर मिळणार आहे. गॅस बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे अंतर ठेवले आहे. त्यामुळे जवळपास दीड महिन्यानंतर गॅस बुक करता येणार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा महिलांना चुली पेटवाव्या लागणार आहे.

 PM Ujjawala Yojana
LPG Cylinder: वेळीच व्हा सावध! गॅस बुकिंगच्या नावाखाली बँक अकाऊंट होतंय रिकामं; या चूका टाळा

अन्नपूर्णा योजनेची अंबलबजावणी कागदावरच

अन्नपूर्णा योजनेसंदर्भात ३० जुलै २०२४ आणि ४ सप्टेंबर २०२४ ला निर्णय निघाले. त्यानुसार राज्यातील ५२ लाख १६ हजार महिलांना दरवर्षी ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता दीड वर्ष उलटून गेले आहे तरी महिलांना एकही गॅस सिलिंडर मोफत मिळालेला नाही.

 PM Ujjawala Yojana
Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com