LPG consumers receive SMS alerts as government tightens subsidy eligibility based on income verification saam tv
देश विदेश

LPG Subsidy New Rule: ... तर बंद होणार गॅस सबसिडी, 7 दिवसांत करा हे काम, फोनवर आलेल्या मेसेजमध्ये नेमकं काय?

LPG Subsidy Income Limit 10 Lakh India Rule: एलपीजी गॅस सबसिडीबाबत नवा इशारा! उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास सबसिडी बंद होऊ शकते. तुमच्या फोनवर आलेल्या SMS मध्ये काय सांगितलं आहे आणि 7 दिवसांत काय करायचं ते जाणून घ्या.

Omkar Sonawane

देशातील एलपीजी गॅस ग्राहकांना सध्या एक नवीन SMS येत आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, जर एखाद्या ग्राहकाची किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांची गॅस सबसिडी बंद केली जाऊ शकते. हा मेसेज सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल, भरात पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून पाठवला जात आहे.

SMS मध्ये काय म्हटले आहे?

ये मेसेजमध्ये नमूद केले आहे की, आयकर विभागाच्या नोंदीनुसार ग्राहक किंवा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आहे. जर ग्राहक या माहितीशी सहमत नसतील, तर त्यांनी 7 दिवसांच्या आत तक्रार नोंदवावी. वेळेत प्रतिसाद न दिल्यास गॅस सबसिडी बंद केली जाऊ शकते. सरकारचे म्हणणे आहे की, गॅस सबसिडी फक्त गरजू लोकांनाच मिळावी. त्यामुळे आता तेल कंपन्या ग्राहकांची माहिती आयकर विभागाच्या डेटाशी पडताळून पाहत आहेत. यामुळे कोण सबसिडीसाठी पात्र आहे आणि कोण नाही हे स्पष्ट होणार आहे.

मुळात हा नवीन नियम नाही. 2015 मध्येच सरकारने जाहीर केले होते की, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना एलपीजी सबसिडी मिळणार नाही. आधी लोकांना स्वईच्छेने सबसिडी सोडण्याचे आवाहन केले जात होते. मात्र आता तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.

SMS आला असल्यास काय करावे?

जर एखाद्या ग्राहकाला असा मेसेज आल आणि माहिती चुकीची वाटत असेल तर त्यांनी तात्काळ तक्रार नोंदवावी. यासाठी 1800 -2333-555 टोलफ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच संबंधित तेल कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार करता येते.

सबसिडी बंद झाल्यास काय होईल?

सबसिडी बंद झाली तरी गॅस सिलेंडर मिळत राहतील. मात्र तो बाजारभावाने खरेदी करावा लागेल आणि सबसिडीची रक्कम बँक खात्यात जमा होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT