Comedian Death News: प्रसिद्ध कॉमेडियन काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Comedian Death News: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राज शर्मा यांचे 50 व्या वर्षी निधन झाले. अभिनेता वीर दास यांनी भावनिक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
comedian raj sharma passes away
comedian raj sharma passes away Saam tv
Published On

Comedian Death News: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राज शर्मा यांचे यांचे २४ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने कॉमेडी विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राज शर्मा यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी मागील काही महिन्यांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे. राज शर्मा हे विशेषतः अमेरिकेतील स्टँड-अप कॉमेडी सर्किटमध्ये सक्रिय होते. त्यांच्या विनोदात सामाजिक निरीक्षण आणि हलक्याफुलक्या अनुभवांचा उत्तम संगम दिसतो. त्यामुळे ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते.

comedian raj sharma passes away
Model Killing Case: २७ वर्षीय प्रसिद्ध मॉडेलची गोळ्या झाडून हत्या; सासू संशयाच्या भोवऱ्यात, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

त्यांच्या निधनानंतर अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये राज शर्मा यांना आठवत लिहिले की, "तू एक उत्तम मित्र होतास आणि तुझं हृदय खूप मोठं होतं. एक विनोदवीर म्हणून, मी तुला 'विनोदाच्या विश्वातील सर्वोच्च सन्मानासह' निरोप देत आहे. तुझ्या नंतर परफॉर्म करणं हे जवळपास अशक्यच होतं. भावा, तुझ्या आत्म्यास शांती लाभो."

comedian raj sharma passes away
Akshay Kumar: अक्षय कुमारच्या लेकीकडे अश्लील फोटोंची मागणी, आरोपी गजाआड; खिलाडीने सांगितली A टू Z माहिती

राज शर्मा यांची अखेरची पोस्ट व्हायरल

राज यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, रुग्णालयातून ते इन्स्टाग्रामवर नियमितपणे फोटो पोस्ट करत होते. त्यांची अखेरची पोस्ट ७ एप्रिल २०२६ रोजी केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते, "या वेळी केवळ २ लिटर द्रव (fluid) निघाले. मला २.५ लिटरपेक्षा जास्त असेल असा अंदाज होता. त्यामुळे, IR विभागातील कर्मचाऱ्यांना दुपारचे मी देणार आहे.ईस्टर साजरा करणाऱ्या सर्वांना माझ्याकडून, थेट ICU मधून, ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com