lok sabha election Saam Tv
देश विदेश

Lok Sabha 2024: मिशन लोकसभा; नाराज नेत्यांवर भाजपच्या टीम-८ची नजर, काय आहे BJPचा नवा प्लान

Bharat Jadhav

Lok Sabha Election 2024 BJP Formed Team 8 :

लोकसभा २०२४ साठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. भाजप नेत्यांनी विविध राज्यात बैठकांचे सत्र चालू केलंय. पक्ष संघटना मजबूत करण्यासह विरोधीपक्षात खिंडार पाडण्याची रणनीती भाजपने आखलीय. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते इतर पक्षातील नाराज नेत्यांवर नजर ठेवून असणार आहेत. दुसऱ्या पक्षात नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचत त्यांना भाजपात समाविष्ट करण्याची योजना भाजपने आखलीय. (Latest News)

भाजपने (BJP) यासाठी टीम-८ स्थापन केली असून ही टीम विरोधीपक्षांचं टेन्शन वाढवेल असं म्हटलं जात आहे. भाजपने बनवलेली ही टीम सपा, बसपा, आरएलडी, जेडीयूसह इतर विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करेल. भाजपने तयार केलेल्या या टीममध्ये केंद्रीय भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव, केंद्रीय मंत्री मनसूख मंडवियाय आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनिल बन्सल यांचा समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा २०२४ मध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी भाजप तयारीला लागलाय. पक्ष मजबूत करण्यासह इतर पक्षातील नेत्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत एक समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीमध्ये केंद्रीय भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव, केंद्रीय मंत्री मनसूख मंडवियाय आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनिल बन्सल यांचा समावेश आहे. या समितीला टीम-८ नाव देण्यात आले आहे. ही टीम-८ इतर पक्षातील नाराज नेत्यांना भाजपात आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

गेल्या काही विधानसभासह मागील निवडणुकीत भाजपच्या ही रणनीती खूप यशस्वी राहिलीय. यामुळे केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजप ही रणनीतीवर काम करत आहे. इंडिया आघाडीमधील वाढता अंतर्गत कलह हा भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. वाढत्या कलहामुळे अनेक नेते इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात.

पुढील काही महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे पक्षातील नेते नाराज किंवा दुखी होऊ नये, याची काळजी भाजप ज्येष्ठ नेते घेत आहेत. स्थापन करण्यात आलेल्या टीमवर अशा नेत्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलीय. तसेच बाहेर येणाऱ्या नेत्यांना पक्षात घ्यायचं का नाही याची जबाबदारी या समितीची असेल. जर या समितीने त्या नेत्याला सहमती दर्शवली तर त्या नेत्याला पक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT