आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. पक्षामध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस आघाडीच्या समितीची बैठक पार पडली. देशभरातील २९० जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय. विशेष या जागांवर कोणत्या उमेदवारांना तिकीट देण्यात यावे, याची चाचपणीदेखील पक्षाकडून करण्यात येत आहे. देशभरातील ज्या जागांवर काँग्रेसची पकड मजबूत आहे. त्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलीय.(Latest News)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस ३९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. यात २९० जागांवर काँग्रेसचे उमेदवारांना तिकीट दिलं जाईल. तर मित्रपक्षांसोबत काँग्रेस १०० जागांवर निवडणूक लढवेल. म्हणजे काँग्रेस एकूण ३९० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं रणनीती पक्षाकडून आखत आलीय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच २९० जागांपैकी ज्या जागांवर काँग्रेसची (Congress) पकड मजबूत आहे किंवा त्यांचा बाल्लेकिल्ला आहे त्या जागांवरील उमेदवारांची (candidates) निवड केली जात आहे. काँग्रेस ईशान्येतील जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस एकट्याने १० राज्यात आणि ९ राज्यात आघाडीतील पक्षांसोबत निवडणूक(Election) लढवण्याची रणनीती आखलीय.
गुजरात, हरियाणा, आसाम, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, आणि ओडिशामध्ये काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस दिल्लीत ५, बिहारमध्ये ९ ते १०, पंजाब ८ ते९ , तमिळनाडू ९ ते ११, उत्तर प्रदेश १० ते १५, पश्चिम बंगाल ३ ते ५, काश्मीर ३, झारखंड ९ आणि महाराष्ट्रात २४ ते २६ जागांवर उमेदवार देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.