Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत 'विधानसभा पॅटर्न'; भाजपनं आखली खास रणनीती

Pm Narendra Modi Amit Shah: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विधानसभेतच्या यशाचे पॅटर्न वापरू शकते. यातच पक्ष लवकरच आपल्या उमेदवारांची नावे जाहीर कजर शकते.
Pm Narendra Modi Amit Shah
Pm Narendra Modi Amit ShahSaam Tv
Published On

BJP Lok Sabha Election Plan:

अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या यशानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती तयार केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विधानसभेतच्या यशाचे पॅटर्न वापरू शकते. यातच पक्ष लवकरच आपल्या उमेदवारांची नावे जाहीर कजर शकते. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यसभेचे खासदार उभे करू शकेल, अशी चर्चा आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, निवडणुकीआधीच उमेदवारांची यादी जाहीर केल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा झाला होता. यामुळे पक्षाला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेण्यास मदत मिळाली होती. मात्र विधानसभेत केलेल्या प्रयोगाची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत करण्याचा पक्ष विचार करत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Narendra Modi Amit Shah
Amethi Lok Sabha: अमेठीत यंदा स्मृती इराणी जिंकणार की राहुल गांधी विजय मिळणार? सर्वेक्षणात समोर आली माहिती

याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितलं की, तीन राज्यातील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सध्या शिगेला पोहोचली आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांची नावे जाहीर करणे हे निवडणुकीच्या दिशेने एक चांगले पाऊल ठरू शकते, असं सूत्रांचा म्हणणं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आगामी लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच भाजपची दिल्लीत बैठक झाली होती. दोन दिवसीय बैठकीला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे पक्षाध्यक्षही उपस्थित होते. यात निवडणुकीपूर्वी उमेदवारांची नावे जाहीर करणे हे कसे यशस्वी ठरले आहे, हे त्यांनी सांगितले.

Pm Narendra Modi Amit Shah
Political News : भाजप अॅक्शन मोडवर, लोकसभा निवडणुकांसाठी प्लान; देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी

पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजप जानेवारीच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करू शकते. तर निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होऊ शकतात. पक्ष राज्यसभा खासदार आणि इतर प्रमुख चेहऱ्यांनाही निवडणूक लढवण्यास सांगू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com