Political News : भाजप अॅक्शन मोडवर, लोकसभा निवडणुकांसाठी प्लान; देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी

BJP Action Plan For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप अॅक्शन मोडवर असून, दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections
BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections SAAM TV
Published On

संजय गडदे, मुंबई

BJP Plan For Loksabha Elections 2024 :

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात आतापासूनच रण तापलं आहे. भाजपनं रणनीती आखली असून, तिच्या अंमलबजावणीलाही सुरुवात केल्याचं दिसतं. भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने मार्गदर्शन शिबीर आयोजित केले असून, फडणवीस हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. आतापासून सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून संपूर्ण देशाचं राजकारण ज्या महाराष्ट्राभोवती फिरतंय, तिथेच थेट अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचे दिसते.

मुंबईतील भाईंदर उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हे मार्गदर्शन शिबीर होणार आहे. पुढील दोन दिवस ते भरवलं जाणार असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.

काय आहे रणनीती

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं 'महाविजय २०२४' मोहीम हाती घेतलीय. त्यानुसार पक्षाने रणनीती आखली आहे. संपूर्ण राज्यात वॉररूमचं जाळं उभारलंय.

वॉररूममधून २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलीय. आता विधानसभा क्षेत्रांतील आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections
Antarwali Sarati Lathicharge: अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील सत्य बाहेर येणार, कोणालाही सोडणार नाही: गृहमंत्री फडणवीस

मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि बुथप्रमुखांची एक टीम तयार केली होती. योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली की नाही याचा आढावा बैठकीत घेणार आहेत.

प्रत्येक मतदारसंघ आणि उमेदवारांवर वॉररूमद्वारे भाजप लक्ष ठेवणार आहे. मतदारसंघांतील समस्या आणि महत्वाच्या विषयांची माहितीही घेतली जाईल.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना कोणत्याही परिस्थितीत सोबत घेण्याच्या संदर्भातही शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

BJP Action Plan For Loksabha Election 2024, Devendra Fadnavis Maharashtra Elections
Rajasthan Election : पक्षाने जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्यास सांगितलं, गेहलोत यांच्याशी झालेल्या वादावर काय म्हणाले पायलट? वाचा....

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com