Antarwali Sarati Lathicharge: अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील सत्य बाहेर येणार, कोणालाही सोडणार नाही: गृहमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis: अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील सत्य बाहेर येणार, कोणालाही सोडणार नाही: गृहमंत्री फडणवीस
Devendra Fadnavis On Antarwali Sarati Lathicharge
Devendra Fadnavis On Antarwali Sarati LathichargeSaam Tv
Published On

>> पराग ढोबळे, नागपूर

Devendra Fadnavis On Antarwali Sarati Lathicharge :

''अंतरवली सराटीतील घटनेत कडक कारवई केली जाईल. यात कोणालाही सोडलं जाणार नाही. यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत'', असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. हे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप करण्यात आला होता. मात्र आता महत्वाचा खुलासा झाला असून देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis On Antarwali Sarati Lathicharge
IPS Exam: IPS अधिकारी होण्यासाठी उंची आणि वजन किती असावे लागते? 'या' एका कमतरतेमुळे सरकारी नोकरीच स्वप्न भंगू शकतं

फडणवीस म्हणाले की, ''जेव्हा कुठेही पोलीस बळाचा वापर करायचा असतो. त्यावेळी त्याठिकाणचे प्रमुख निर्णय घेत असतात. गृहमंत्रालय किंवा पोलीस महासंचालक यांना विचारून हे निर्णय केले जात नाही. त्यामुळे जे सत्य होत तेच बाहेर आलंय.''  (Latest Marathi News)

माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे याबाबत माहिती मिळवण्यासाठी आरटीआयच्या माध्यमातून अर्ज केला होता. यात सांगण्यात आलं की, या संपूर्ण लाठी हल्ला प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष आहेत. त्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नव्हते.

Devendra Fadnavis On Antarwali Sarati Lathicharge
Santosh Bangar: अंधारे यांना बहीण मानतो; कळमनुरीत उमेदवार घोषित केल्यानंतर बांगर नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यानंतर त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर असून अनेक ठिकाणी त्यांच्या सभा पार पडत आहेत. या सभांमधून अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी ते करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com