IPS Exam: IPS अधिकारी होण्यासाठी उंची आणि वजन किती असावे लागते? 'या' एका कमतरतेमुळे सरकारी नोकरीच स्वप्न भंगू शकतं

IPS अधिकारी होण्यासाठी उंची आणि वजन किती असावे लागते? 'या' एका कमतरतेमुळे सरकारी नोकरीच स्वप्न भंगू शकतं
IPS Exam
IPS ExamSaam TV
Published On

IPS Physical Eligibility :

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून, आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस अधिकारी (सरकारी नोकरी) यांसारख्या पदांवर सरकारी नोकरी मिळवता येते. आयएएस अधिकारी होण्यासाठी कोणतीही शारीरिक चाचणी उत्तीर्ण करण्याची आवश्यकता नसली तरी, आयपीएसमध्ये भरतीसाठी उंची आणि वजन संबंधित पात्रता उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

आयपीएस अधिकारी बनणे सोपे नाही. यासाठी फक्त परीक्षा (IPS परीक्षा) उत्तीर्ण होणे आवश्यक नाही, तर इतर अनेक बाबी (IPS Officer Requirements) पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्हालाही आयपीएस अधिकारी बनायचे असेल तर यासाठी शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी कोणती तयारी करावी लागेल, हे जाणून घ्या...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IPS Exam
IAS आणि IPS यांच्यात कोणाकडे असतात जास्त अधिकार आणि पगार, दोघांमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या...

आयपीएस अधिकाऱ्याचे वर्क प्रोफाइल काय आहे?

आयपीएस अधिकाऱ्यांकडे कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे गुन्हे, दरोडा, चोरी इत्यादी घटना घडू नयेत, याची काळजी घ्यावी लागेल. त्यांना जनतेची काळजी घ्यावी लागते. आयपीएस अधिकाऱ्यांचे कामाचे वेळापत्रक अतिशय कडक असते आणि त्यांना कठीण परिस्थितीतही काम करावे लागते. (Latest Marathi News)

IPS साठी निर्धारित शारीरिक पात्रता (IPS Physical Eligibility)

आयपीएससाठी उंची

165 सें.मी, ST साठी (पुरुष) 160 सें.मी. 150 से.मी, ST साठी (महिला) 145 से.मी.

छाती

(पुरुष) किमान 84 सेमी, फुलून 5 सेमी

(महिला) किमान 79 सेमी, फुलून 5 सेमी

IPS Exam
Shaikshanik Karj Yojana: परदेशात शिक्षण घ्यायचं आहे? महाराष्ट्र सरकार देतेय 20 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे योजना...

आयपीएस अधिकाऱ्याचे वजन किती असायला हवं?

भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होण्यासाठी वजनाबाबत कोणतेही नियम नाहीत. मात्र, त्यांनी स्वत:ला मेंटेन ठेवणे महत्त्वाचे आहे. आयपीएस प्रशिक्षणादरम्यान त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक चाचण्या द्याव्या लागतात, ज्यासाठी त्यांना तंदुरुस्त असणे अनिवार्य आहे. त्यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या (IPS Training) प्रशिक्षण कार्यक्रमात शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com