अनेकांचं उच्च शिक्षण घेऊन चांगलं करिअर करण्याची इच्छा असते. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना ते शक्य होत नाही. अनेक मुलं हुशारही असतात, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हवं ते शिक्षण घेता येत नाही. अशातच काहींना परदेशात जाऊनही शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र आता परदेशात आणि देशांतर्गत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार तुमची मदत करणार आहे.
सरकारने आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या पार्श्वभूमीवर, संबंधितांसाठी 'शैक्षणिक कर्ज योजना' (Shaikshanik Karj Yojana) अंमलात आणली आहे. या योजनेमुळे बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेऊन नोकरी वा चांगला व्यवसाय थाटण्याचे स्वप्न सर्वसामान्य अन् गोरगरीब विद्यार्थ्यांचे पूर्ण होत आहे. नेमकी काय आहे ही योजना याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ...
शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे. शैक्षणिक कर्ज योजनेत अत्यंत कमी व्याजदर आकारला जातो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्यासाठी शैक्षणिक कर्ज योजनेची सुरवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. शिक्षणासाठी कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही. या योजनेच्या साहाय्याने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. (Latest Marathi News)
गरीब कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते. विद्यार्थ्यांना जे शिक्षण कर्ज दिले जाते, त्यावर केवळ ३ टक्के व्याजदर आकारला जातो. विद्यार्थ्यांच्या कोर्सचा खर्च तसेच तो राहत असलेल्या वसतिगृहाचा खर्च या शिक्षण कर्ज योजने मार्फत दिला जातो.
जो पर्यंत विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण करत असतो तो पर्यंत त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. शिक्षण कर्जाच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सोडावे लागत नाही तसेच त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येते. शिक्षण कर्जामुळे विद्यार्थ्याला आत्मविश्वास येतो. या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी दिले जाणारे कर्ज फेडण्याची मुदत जास्त दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा तो नोकरीला लागतो तेव्हा ६ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंत हे कर्ज परत करायचे असते. शिक्षण घेत असताना विद्यार्थी फक्त व्याजाची रक्कम जमा करू शकतो त्याला शिक्षण घेत असताना कर्जाची रक्कम भरायची गरज नाही. कर्जाची मूळ रक्कम नोकरीला लागल्यावर ६ महिन्यांपासून ५ वर्षापर्यंत भरली तरी चालते.
अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन २००९ या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.१० लाख व परदेशासाठी रु.२० लाख इतकी आहे. या कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो.
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन आहे. विद्यार्थ्याला तो राहत असलेल्या ठिकाणाच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन शिक्षण कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे (सदर बँक शिक्षण करण्यासाठी कर्ज देत असल्याची खात्री करावी) अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी. परिपूर्ण अर्ज बँकेत जमा करावा. बँक मॅनेजर अर्ज आणि जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करेल व कागदपत्रे योग्य असल्यास विद्यार्थ्याला शिक्षण कर्जासाठी पात्र ठरवून कर्ज प्रदान करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.