राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट टोंक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जुने मुद्दे विसरून पायलट या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार करत आहेत.
दरम्यान, सचिन पायलटने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत झालेल्या वाद आणि मतभेदाबाबत एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे. पायलट म्हणाले की, काँग्रेस पक्षाने त्यांना भूतकाळ विसरून पुढे जाण्यास सांगितले आहे. निवडणुकीवर त्यांचा भर आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला. आम्ही संघर्ष करून बहुमत मिळवू, असे ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट अशोक गेहलोत यांच्यासोबतच्या त्यांच्या जुन्या वादावर पायलट म्हणाले, "ही भूतकाळातील गोष्ट आहे... आम्ही काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. पक्षाने माझ्या मुद्द्यांची दखल घेतली. पक्षाच्या हायकमांडने मला सांगितले की, माफ करा, विसरा आणि पुढे जा.'' (Latest Marathi News)
यापूर्वी जुलैमध्येही सचिन पायलट यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी मतभेद विसरून एकमेकांना माफ करण्याविषयी बोलले होते. पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते म्हणाले होते की, "इकडे काही घडलं असेल, तर ती मोठी गोष्ट नाही. कारण कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष आणि जनता महत्त्वाची असते.''
पायलट आणि गेहलोत यांच्यात काय आहे वाद?
दरम्यान, सचिन पायलट यांनी 2020 मध्ये अशोक गेहलोत सरकारविरोधात बंड केले होते. त्यावेळी दोन वर्षे राजस्थानचे उपमुख्यमंत्री राहिलेले सचिन पायलट 19 आमदारांसह दिल्लीजवळील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये पोहोचले होते. काँग्रेसला हे थेट आव्हान होते - एकतर त्यांना मुख्यमंत्री बनवावे, नाहीतर ते काँग्रेस सोडावी.
मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला, कारण 45 वर्षीय सचिन पायलट यांच्यापेक्षा 26 वर्षे ज्येष्ठ अशोक गेहलोत यांनी त्यांचा सहज पराभव केला आणि 100 हून अधिक आमदारांना पंचतारांकित रिसॉर्टमध्ये नेऊन त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.