Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: पुढील २- ४ महिन्यांत योगी आदित्यनाथ यांना CM पदावरून हटवणार; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

Arvind Kejriwal Criticized BJP And RSS: लखनौमध्ये अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप साम टीव्ही, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज उत्तर प्रदेशमध्ये आहेत. लखनौमध्ये अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी भारत आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. त्यांनी आरक्षण संपवणं, हा भाजप आणि आरएसएसचा अजेंडा आहे, अशी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवलं जाणार असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद लखनौमध्ये पार पडली. यावेळी बोलताना केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत. मोदी पुढच्या वर्षी पंतप्रधान राहणार नाहीत. पुढील वर्षी १७ सप्टेंबरला अमित शाहंना पंतप्रधान बनविण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे.

अमित शाह यांच्या रस्त्यात येणाऱ्या अनेक नेत्यांना बाजूला केलंय. मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान यांना बाजूला केलंय. देवेंद्र फडणवीस यांना संपवलं. आता योगी अदित्यनाथ यांना हटवण्याचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक दावा (Arvind Kejriwal Criticized BJP And RSS) अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. जर त्यांचं सरकार आलं, तर पुढील २ ते ३ महिन्यात योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवलं जाईल, असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

त्यांना ४०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. कारण त्यांना आरक्षण काढायचं आहे. आरक्षण संपवण हा भाजप आणि आरएसएसचा अजेंडा असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं (Arvind Kejriwal Over Reservation) आहे. देशातील अनेक राज्यात भाजपच्या जागा कमी होत असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. भाजपने चारशे पारचा नारा दिलाय. कारण त्यांना पहिला हल्ला आरक्षणावर (Reservation) करायचा आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत. संविधान वाचवलं तर लोकशाही वाचेल, असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT