छत्तीसगड सरकारने राज्यातील सर्व दारू दुकानांमध्ये कॅशऐवजी फक्त ऑनलाइन पेमेंटद्वारे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दारू विक्रीवर नजर ठेवण्यासाठी सर्व दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून २४ तास देखरेख केली जाणार आहे.
बेकायदेशीर दारू विक्री, फार्महाऊस पार्ट्या आणि अंमली पदार्थांवर कडक कारवाईचे आदेशही मंत्री लखनलाल देवांगन यांनी दिले आहेत.
Liquor : सर्व दारूच्या दुकानांमध्ये ऑनलाइन पेमेंटद्वारे दारू खरेदी करता येणार आहे. छत्तीसगडमधील दारू दुकानांची व्यवस्था आता पूर्णपणे कॅशलेस होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार मिळाल्यानंतर मंत्री लखनलाल देवांगन यांनी उत्पादन शुल्काच्या आढवा बैठकीत सूचना दिल्या. दारूच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाऊन त्यावरुन २४ तास देखरेख केली जाणार, अशी माहिती मंत्री देवांगन यांनी दिली. त्यांनी दारूची बेकायदेशीर विक्री आणि अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, वाहतूक आणि विक्री यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले. छत्तीसगडमध्ये ३२०० कोटी रुपयांचा दारू घोटाळा झाला होता.
दारूच्या दुकानांमध्ये ऑनलाइन पेमेंट लागू केले पाहिजे. दुकानांमध्ये १०० टक्के पेमेंट ऑनलाइन पद्धतीने केले पाहिजे. यामुळे कोणतीही अनियमितता होणार नाही. हॉटेल, ढाबे आणि फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीर दारू विक्री आणि सेवनावर कडक नजर ठेवली जाणार आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री लखनलाल देवांगन म्हणाले.
मंत्री देवांगन यांनी अधिकाऱ्यांनी फार्म हाऊसमधील दारू पार्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी दारू दुकानांची व्यवस्था, त्यांचे परवाने, परवाना व्यवस्था, मार्केटिंग कॉर्पोरेशन आणि बारक्लबच्या कामकाजाची माहिती घेतली. राज्याचे महसूल लक्ष्य साध्य करण्यासाठीच्या बैठकीत या संबंधित प्लान सादर करण्यात आला.
दारूच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांवर २४ तास देखरेख केली जाईल, असे मंत्री लखनलाल देवांगन यांनी सांगितले. आंतरराज्यीय सीमेवरील उत्पादन शुल्क तपासणी नाक्यांवर दक्षता वाढवण्यावर आणि विशेष मोहिमा राबवण्यावर त्यांनी भर दिला. हॉटेल्स, ढाबे आणि फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या दारूची बेकायदेशीर विक्री आणि सेवन रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.