Land for Job Scam Saam Tv
देश विदेश

Land for Job Scam: लालू प्रसाद यादव यांची तब्बल 10 तास ईडी चौकशी, विचारण्यात आले 50 हून अधिक प्रश्न

Lalu Prasad Yadav : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणी दहा तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत.

Satish Kengar

Land for Job Scam:

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणी दहा तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आले आहेत. ईडीच्या विशेष पथकाने पाटणाच्या गांधी मैदान परिसरातील झोन कार्यालयात त्यांची चौकशी केली.

लालू प्रसाद सोमवारी सकाळी 11.15 वाजता त्यांची मोठी मुलगी खासदार मीसा भारतीसोबत ईडी कार्यालयात पोहोचले होते. यानंतर त्यांना कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आले. त्यानंतर चौकशीची प्रक्रिया सुरू झाली. लालू प्रसाद यादव हे रात्री 9 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर आले. या प्रकरणी ईडी मंगळवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांची चौकशी करणार आहे.

दिल्ली ईडी मुख्यालयातील सुमारे 12 अधिका-यांचे एक विशेष पथक चौकशीसाठी पाटणा येथे आले आहे. ज्यात या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि इतरांचा समावेश आहे. चौकशीच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2004 ते 2009 या काळात तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्या कार्यकाळात नोकरीच्या बदल्यात जमीन या प्रकरणाशी संबंधित 50 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहा तास चौकशीदरम्यान लालूप्रसाद यांना चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ताही देण्यात आला. डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे त्यांना ठरवून दिलेल्या वेळी घेण्याचीही परवानगी होती. ही औषधे देण्यासाठी मुलगी मीसा भारतीला ठराविक अंतराने कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. (Latest Marathi News)

किती लोकांना जमिनी घेऊन त्यांना रेल्वेत कुठे आणि कोणत्या पदांवर नोकऱ्या दिल्या आहेत, असा प्रश्न लालू प्रसादांना विचारण्यात आला होता, असं सूत्रांचा म्हणणं आहे. या जमिनी सर्वातआधी बेनामी कंपन्यांच्या नावावर घेतल्या होत्या. ज्यांचे संचालक त्यांची पत्नी, मुली, मुलगा आणि त्यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या नावावरही अनेक जमिनी नोंदवल्या गेल्या, असा आरोप आहे. याचप्रकारणी आज त्यांची चौकशी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

SCROLL FOR NEXT