"Brutal sword attack on Kuldeep Singh, PA to ex-MP, caught on video in Ludhiana; public silence during murder raises serious questions on society and safety." Viral Video
देश विदेश

माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने तुकडे पाडले, व्हिडिओ व्हायरल

Kuldeep Singh Murder : लुधियानामध्ये माजी खासदाराच्या पीए कुलदीप सिंह यांची रस्त्यातच तलवारीने हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

Namdeo Kumbhar

पंजाबच्या लुधियानामधून एक हादरवाणारी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री माजी खासदाराच्या पीएची हत्या करण्यात आली आहे. चाकूने सपासप वार करत जीव घेतला. हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिरोमणी अकाली दल पक्षाचे माजी खासदार जगदेव सिंह तलवंडी यांचे पीए कुलदीप सिंह मुंडिया यांची शुक्रवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. तलवारीने सपासप वार करत त्यांचे तुकडे करण्यात आले. घटनेस्थळावर उपस्थित असणाऱ्या लोकांनी या भयंकर घटनेचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

फार्महाऊसमधून कुलदीप सिंह मुंडियां शुक्रवारी रात्री उशिरा कारने बाहेर निघाले होते. रस्त्यात त्यांना आरोपींनी घेरलं अन् जबरदस्तीने बाहेर खेचलं. त्यानंतर पाच ते सहा जणांनी तलवारीने त्यांच्यावर सपासप वार केले. जोपर्यंत कुलदीप यांचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत आरोपींनी सपासप वार केले. कुलदीप यांचे हात-पाय धडापासून वेगळं करत त्यांचा निर्घृण खून केला.

आरोपीवर तलवारीने सपासप वार, लोकांची बघ्याची भूमिका -

धक्कादायक म्हणजे, कुलदीप यांच्यावर आरोपी सपासप वार करत होते, तेव्हा आजूबाजूला लोक ये-जा करत होते. पण कोणत्याही व्यक्तीने आरोपींना अडवण्याची हिंमत केली नाही. कुलदीप सिंह यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. भीतीमुळे पण एकजणही धावला नाही. एका व्यक्तीने हिंमतीने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पंजाब आणि लुधियानामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी फरार -

कुलदीप यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता.घटनेचा व्हिडिओ शूट करणाऱ्या तरूणाने आपल्याकडील फुटेज पोलिसांना दिले. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा कऱण्यात आला. त्यानंतर मतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवण्यात आला. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या कुलदीप सिंह यांच्या कुटुंबीयांना या हत्याकांडाची माहिती दिली आहे. कुलदीप सिंह यांचा कोणाशी वाद होता, त्यांच्या हत्येचे कारण काय? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुलदीप सिंह प्रॉपर्टी व्यवसायात कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते कॅनडाला गेले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबही तिथेच स्थायिक झाले. कॅनडात काही काळ घालवल्यानंतर ते पुन्हा लुधियानाला परतले आणि एकटेच राहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT