Pudachi Vadi: विदर्भातली प्रसिद्ध पुडाची वडी कशी बनवायची?

Siddhi Hande

विदर्भ स्पेशल पुडाची वडी

विदर्भाची स्पेशल पुडाची वडी तुम्ही कधी खाल्लीये का? पुडाच्या वडीला सांबार वडीदेखील म्हणतात.

Pudachi Vadi | google

साहित्य

बेसन, मैदा, तेल, ओवा, हळद, मीठ, चिरलेली कोथिंबीर, सुके किसलेले खोबरे,भाजक्या डाळीचे कूट, खसखस, तीळ, धने-बडीशेप, आलं लसूण पेस्ट, गूळ, मीठ

Pudachi Vadi | google

बेसन

सर्वात आधी तुम्हाला एका परातीत बेसन आणि मैदा घ्यायचा आहे. त्यात थोडं मोहन टाकून मिक्स करा.

Pudachi Vadi | google

१५-२० मिनिटे ठेवा

यामध्ये ओवा टाका.पिठात पाणी टाकून ते मळून घ्या. हे पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवा.

Pudachi Vadi | yandex

फोडणी

सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. यात आलं लसूण पेस्ट, तीळ आणि खसखस छान परतून घ्या.

Pudachi Vadi | google

मसाले

यामध्ये किसलेले खोबरे, भाजलेल्या डाळींचा कूट आणि मसाले परतून घ्या.यामध्ये बारीक चिरलेली ३-४ वाटी कोथिंबीर टाकावी.

Pudachi Vadi | Google

सारण सुके असावे

शेवटी गूळ-चिंच घालून सारण छान मिक्स करा. हे सारण सुके असावे.

Pudachi Vadi | Google

सारण

यानंतर पीठाची गोल पुरी लाटावी. त्यात मध्यभागी सारण भरावे.

Pudachi Vadi | Google

चौकोनी आकारात डुमडून घ्या

यानंतर चौकोनी आकारात डुमडून ध्यावे. कडा बंद करण्यासाठी पीठ वापरु शकतात.

Pudachi Vadi

तळून घ्या

यानंतर तुम्ही तेलात या वड्या गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.

Next: अस्सल पारंपारिक पद्धतीचा 'लसूणी डाळ तडका' कसा बनवायचा?

Lasooni Dal Tadka Recipe
येथे क्लिक करा