Lasooni Dal Tadka Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा 'लसूणी डाळ तडका' कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

लसूणी डाळ तडका

अस्सल पारंपारिक रेसिपी चवीला भारी असतात. लसूण डाळ तडका खाण्याची मज्जा वेगळीच असते. अनेकजण ढाब्यावर जाऊन ही रेसिपी टेस्ट करतात.

Lasooni Dal Tadka Recipe

सोपी रेसिपी

लसूणी डाळ तडका रेसिपी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Lasooni Dal Tadka Recipe

साहित्य

लसूणी डाळ तडका बनवण्यासाठी तुरीची डाळ, मुगाची डाळ, हळद, हिंग, तेल, कांदा, टोमॅटो, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तूप, लसूण पाकळ्या, सुकी लाल मिरची, कश्मिरी मिरची, जिरे, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.

Lasooni Dal Tadka Recipe

डाळ शिजवून घ्या

सर्वातआधी तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून गॅसवर कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवताना डाळीमध्ये हिंग घाला.

Lasooni Dal Tadka Recipe

डाळीला फोडणी द्या

गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे आणि मोहरी याची फोडणी द्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, आले - लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घाला.

Fodni

मसाले मिक्स करा

मिश्रणात टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या नंतर यात हळद आणि चवीनुसार मीठ घाला.

spices

डाळ उकळून घ्या

शिजवलेली डाळ या संपूर्ण मिश्रणात घाला मिश्रणात गरम पाणी घालून चांगली उकळी येऊ द्या.

Dal Tadka | yandex

डाळीला तडका द्या

नंतर एका छोट्या भांड्यात डाळीला तडका देण्यासाठी साजूक तूप घ्या त्यात जिरे आणि बारीक चिरलेला लसूण टाका.

Lasooni Dal Tadka Recipe

लसूणी डाळ तडका

नंतर गॅस बंद करा आणि त्यात सुक्या लाल मिरच्या आणि कश्मीरी लाल तिखट टाका अशाप्रकारे गरमा गरम लसूणी डाळ तडका तयार होईल.

Lasooni Dal Tadka Recipe | yandex

next: Home Remedies For Diabetes: डायबिटीजवर घरच्या घरी करा 5 सोपे उपाय, शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

येथे क्लिक करा...