संतापजनक! IIT कॅम्पसमध्ये २० वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, फूड कोर्ट चालवणाऱ्याला बेड्या

IIT-मद्रासमध्ये २० वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत फूट कोर्ट चालवणाऱ्या कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.
Rape
Rape Saam Tv News
Published On

iit madras intern molested by food court worker inside campus : कोलकातामध्ये लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आयआयटी मद्रासमध्ये इंटर्नशीप करणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थीनीवर कॅम्पसमध्येच विनयभंग झालाय. रिपोर्ट्सनुसार, २५ जून २०२५ रोजी ही घटना घडली आहे. आयआयटी मद्रास कॅम्पसबाहेर फूड कोर्ट चालवणाऱ्या २२ वर्षाच्या कर्मचाऱ्याने मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.

२५ जून रोजी २२ वर्षीय आरोपीने २० वर्षीय मुलीला धमकी देऊन छेडाछाड करत विनयभंग केला. मुलगी जोरजोरात ओरडल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे. आरोपीचे नाव रोहन कुमार असे आहे. तो कॅम्पसमध्येच फूड कोर्टवर काम करतो. त्याने लाकडी दांड्याचा धाक दाखवत अत्याचार केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून समोर आले आहे.

Rape
महिला कीर्तनकाराची आश्रमातच हत्या, दगडाने ठेचून घेतला जीव, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

धमकी देऊन विनयभंग -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जूनच्या संध्याकाळी एक विद्यार्थिनी आयआयटी-मद्रास कॅम्पसमध्ये एकटी फिरत होती. त्यावेळी २२ वर्षीय रोहन कुमार या आरोपीने तिला लाकडी काठीने धमकावले आणि तिचा लैंगिक छळ केला. विद्यार्थिनीने हिम्मंतीने आरडाओरड केली. त्यामुळे जवळचं असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला घटनेची माहिती मिळाली. सुरक्षा रक्षकाने त्वरित पोलिसांना कळवले. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून रोहन कुमारला ताब्यात घेतले. आरोपी रोहन कुमार हा आयआयटी-मद्रास कॅम्पसच्या फूड कोर्टमध्ये काम करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

Rape
मराठी भाषेविरोधात मुंबईतच आंदोलन? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार -

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील एका लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याने बलात्कार केला. तर दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मुख्य आरोपीला या गुन्ह्यात मदत केली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले, जिथून त्यांना ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. या घटनेतील मुख्य आरोपी हा कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. तो कॉलेजच्या तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष आणि TMC च्या विद्यार्थी संघटनेच्या दक्षिण कोलकाता शाखेचा संघटना सचिव असल्याचेही सांगितले जात आहे.

Rape
मराठी भाषेविरोधात मुंबईतच आंदोलन? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com