ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वांनाच गुलाब जाम प्रचंड आवडतात. थंडित गरमा गरम गुलाब जाम खाल्यास अधिकच स्वादिष्ट लागतात.
गाजराची खीर, गाजरचा हलवा आणि गाजराचा पाक इत्यादी मिठाई गाजरापासून बनवल्या जातात. आता तुम्ही गाजरापासून गुलाब जाम सुध्दा बनवू शकता.
गाजर गुलाब जाम बनवण्यासाठी गाजर, तूप, दूध, वेलची पावडर आणि रवा इत्यादी साहित्य लागते.
सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्यांना किसून ठेवा.
यानंतर थोडे तूप टाकून गाजर परतवून घ्या. हलका सुगंध येण्यास सुरुवात झाल्यावर एक कप दूध टाकून शिजवून घ्या.
गाजराने दूध शोषून घेतल्यानंतर त्यात आर्धा कप मिल्क पावडर मिक्स करा. आता तयार झालेल्या मिश्रणाला हलकेसे थंड होऊ द्या आणि छोटे छोटे बॉल्स बनवून घ्या.
आता तयार केलेल्या बॉल्सला फ्राय करा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा आणि नंतर पाकात बुडवा.
तयार केलेल्या गाजर गुलाब जामच्यावर आवडीचे ड्रायफ्रुट्स टाका आणि गरमा गरम सर्व्ह करा.